एक्स्प्लोर
फॅशनच्या नावावर जीन्सची फाडाफाड, बिपाशा भडकली
‘थॉन्ग’ जीन्स हा जीन्सचा नवा प्रकार नुकताच टोकीयोमध्ये लॉन्च करण्यात आला. जपानी कंपनी थिबॉटने ही जीन्स तयार केली असून, जीन्सचा हा नवा प्रकार पाहून अभिनेत्री बिपाशा बासूनेही आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : सध्या फॅशन जगतात ‘थॉन्ग’ जीन्सची मोठी चर्चा आहे. जीन्सचा हा नवा प्रकार नुकताच टोकीयोमध्ये लॉन्च करण्यात आला. जपानी कंपनी थिबॉटने ही जीन्स तयार केली असून, याच्या रुपावरुन सोशल मीडियात ट्रोल होत आहे. जीन्सचा हा नवा प्रकार पाहून अभिनेत्री बिपाशा बासूनेही आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बिपाशाने या जीन्सचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करुन आपला संताप व्यक्त केला. “फॅशनच्या नावावर... आम्हाला जीन्स अतिशय प्रिय आहेत. कृपया याच्यासोबत हे सर्व करु नका... हे अतिशय दुर्दैवी आहे... नेकेड जीन्स मला आवडली नाही...”
सोशल मीडियावर या जीन्सला नेकेड जीन्स असं नाव दिलं आहे. केवळ कापडाचे दोन तुकड्याप्रमाणे दिसणाऱ्या या जीन्सवर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. जीन्सचा हा नवा प्रकार थिबॉट 2018 च्या समर कलेक्शनमधील एक भाग आहे.#thibaut2018ss #dressrehearsal #AmazonFWT A post shared by thibaut (@thibaut_official) on
अभिनेते ऋषी कपूर यांनीही जीन्सच्या या नव्या प्रकाराची टर उडवली आहे.Buy two get one begging bowl free. Sale at Zara's pic.twitter.com/keoWmlbw70
— Rishi Kapoor (@chintskap) June 27, 2016
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















