एक्स्प्लोर
Advertisement
आर्ची-परशासाठी अकोल्यातील तरुणांची बाईक रॅली
अकोला : अकोल्याच्या तरुणाईनं आज ‘सैराट’ चित्रपटाच्या गीतांवर अगदी बेभान होत ‘झिंगाट’ ठेका धरला. निमित्त होतं अकोल्यातील ‘सोशल जस्टीस फोरम’च्या नेतृत्त्वात ‘सैराट’ चित्रपटाच्या समर्थनार्थ निघालेल्या मोटरसायकल रैलीचं.
अकोल्यातील बसस्थानक चौकातील गांधी जवाहर बागेपासून सकाळी साडे अकरा वाजता या रॅलीला प्रारंभ झाला. रेल्वे स्टेशन, टिळकरोड, तहसील चौक, जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यामार्गे निघालेल्या या रॅलीचा समारोप अशोक वाटिकेत करण्यात आला. या समर्थनार्थ रॅलीत सोशल जस्टीस फोरम, संभाजी ब्रिगेड यांच्यासह अनेक दलित संघटना सहभागी झाल्या होत्या.
‘सैराट’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेक वाद-प्रतिवाद सुरु आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सामाजिक समरसतेचा पुरोगामी विचार मांडल्याचे संयोजकांनी म्हटले. या चित्रपटाविरोधात सुरु असलेल्या जातीयवादी प्रचाराला उत्तर देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.
दुपारी साडेबारा वाजता या रैलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीच्या समारोपानंतर रॅलीतील तरुणाईने अशोक वाटिका चौकात ‘झिंगाट’ गाण्यावर ताल धरत या चित्रपटाला आगळे-वेगळे समर्थन दिलेय. राज्यात ‘सैराट’ चित्रपटाच्या समर्थनार्थ सामाजिक संघटनांनी काढलेली ही कदाचित पहिलीच रॅली असल्याचे बोलले जातं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement