Santosh Chaudhari : 'बिग बॉस'फेम दादूसचा हळदी कार्यक्रमात हवेत गोळीबार; पोलिसांकडून तपास सुरू
Santosh Chaudhari : 'बिग बॉस'फेम संतोष चौधरी यांनी नुकत्याच एका हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार केला आहे.
Santosh Chaudhari : आगरी कोळी गीतांचा बादशाह, 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम संतोष चौधरी (Santosh Chaudhari) उर्फ दादूस सध्या चर्चेत आहेत. नुकत्याच एका हळदीच्या कार्यक्रमात त्यांनी हवेत गोळीबार केला आहे. त्यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
संतोष चौधरी (Santosh Chaudhari) यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी तपास सुरू केला आहे. हा व्हिडीओ आरएके मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून पोलीसांचा तपास सुरू आहे.
मध्यरात्री आरएके मार्ग पोलिसांचे एक पथक हळदी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या वराच्या घरी गेले होते. मात्र वर आणि त्याचे कुटुंबीय घरी नव्हते. पोलिसांचं कुटुंबातील काही लोकांशी बोलणं झालं असून त्यांनी दावा केला आहे की, संतोष चौधरी यांनी वापरलेली बंदूक खेळण्यातली होती".
हळदीच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार करण्यासाठी संतोष चौधरी यांनी वापरलेल्या बंदूकीचा पोलीस तपास घेत आहेत. यासंदर्भात त्यांनी संतोष चौधरी यांच्याशीदेखील संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दादूसला चौकशीसाठी बोलावतील आणि त्यांना काही गैरप्रकार आढळल्यास ते पुढील कारवाई करतील.
लोकप्रिय संगीतकाराच्या हळदी कार्यक्रमात दादूसचा ऑर्केस्ट्रा
दादूस उर्फ संतोष चौधरी यांचे हळदी कार्यक्रम सातत्याने सुरू असतात. सध्या लग्नाचा सीझन असल्याने अनेक ठिकाणी त्यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात येत आहे. आता मराठी मनोरंजनसृष्टीतील एका लोकप्रिय संगीतकाराच्या हळदी कार्यक्रमात दादूसचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. सचिन भांगरे (santosh bhangre) नुकताच लग्नबंधनात अडकला असून त्याच्या हळदीला दादूसच्या ऑर्केस्टाचं आयोजन करण्यात आलं होतं. दादूसने त्याच्या आगरी स्टाइलने सचिनची हळद चांगलीच नाचवली. दरम्यान खिशातून बंदूक काढून दादूसनी हवेत गोळीबार केला. या प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल होत आहे.
संतोष चौधरीबद्दल जाणून घ्या... (Who Is Santosh Chaudhari)
आगरी कोळी संगीताने 'बिग बॉस'च्या (Bigg Boss Marathi) घरात दादूसने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच आठवड्यात दादूस सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन बनला होता. महेश मांजरेकरांनीदेखील दादूसच्या खेळीचे कौतुक केले होते. अनेक हळदी कार्यक्रमात दादूसच्या गाण्यांचं आयोजन केलं जातं. दादूसचा मोठा चाहतावर्ग आहे.
संबंधित बातम्या