एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 15 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 15 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Aaichya Maghari: आई आणि लेकीचं नातं; 'आईच्या माघारी' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

Aaichya Maghari: देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आई घडवली असं म्हणतात. देव कोणी पाहिलेला नाही, पण त्याचं रूप असलेली आई प्रत्येकाच्या मागे सावलीप्रमाणे उभी असते कितीही धन-दौलत असेल आणि आई नसेल तर तो एक प्रकारे भिकारीच असतो. म्हणूनच 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' असं समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय. 14 मे हा सर्वत्र मातृदिन म्हणून साजरा केला जातो.  या दिवसाच औचित्य द्विगुणीत करण्यासाठी पिकल म्युझिकचे 'आईच्या माघारी' (Aaichya Maghari) हे नवं कोरं गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे.

Chala Hawa Yeu Dya: मोठ्यांनाही लाजवेल अशी बच्चे कंपनीची धम्माल कॉमेडी; ‘चला हवा येऊ द्या’चा प्रोमो पाहून खळखळून हसाल

Chala Hawa Yeu Dya:  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये बच्चे कंपनीची एन्ट्री झाली आहे. सध्या  'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमाच्या लहान तोंडी मोठा घास या स्पेशल एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये बच्चे कंपनी एक विनोदी स्किट सादर करताना दिसत आहे.  

Parineeti Chopra Raghav Chadha : राघव आणि परिणीती यांचा साखरपुड्यातील रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचा काल साखरपुडा पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत राघव आणि  परिणीती यांचा  साखरपुडा दिल्ली येथील कपूरथला हाऊसमध्ये पार पडला. राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हजेरी लावली होती. राघव आणि परिणी यांच्या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या राघव आणि परिणी यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील राघव आणि परिणीती यांच्यामधील केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  

15:17 PM (IST)  •  15 May 2023

Zara Hatke Zara Bachke: प्रेम, लग्न अन् घटस्फोट, कपिल आणि सौम्याची हटके स्टोरी; 'जरा हटके जरा बचके' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Zara Hatke Zara Bachke: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या  'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला  'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट 2 जून रोजी रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर विकी आणि सारानं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कपिल आणि सौम्याची हटके स्टोरी दाखवण्यात आलं आहे. कपिल सौम्याच्या आयुष्यात काय घडतं? हे प्रेक्षकांना  'जरा हटके जरा बचके'  या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

15:05 PM (IST)  •  15 May 2023

Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला उद्यापासून सुरुवात

Cannes 2023 Live Streaming : जगभरातील सिनेप्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची (Cannes Film Festival) प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. यंदाचा फेस्टिव्हल फ्रान्समध्ये 16 मे ते 27 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय होणार आहे.

15:04 PM (IST)  •  15 May 2023

FTII Recruitment 2023 : FTII मध्ये अनेक पदांवर भरती; सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर आजच करा अर्ज

FTII Recruitment 2023 : फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) पुणे येथे शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी एफटीआयआयमधून शिक्षण घेतले आहे. आता या एफटीआयआयमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे. एफटीआयआयमध्ये गट ब आणि क या श्रेणीच्या पदांसाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 

14:41 PM (IST)  •  15 May 2023

Aai Kuthe Kay Karte: डान्स आणि गाण्यांनी रंगला ईशा आणि अनिषचा साखरपुडा सोहळा; पाहा 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो

Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेत सध्या ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्या सोहळा सुरु आहे. ईशा आणि अनिष यांचा साखरपुडा देशमुखांच्या घरीच पार पडत आहेत. डान्स आणि गाण्यांनी  ईशा आणि अनिषचा साखरपुड्याचा सोहळा रंगणार आहे. नुकताच 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये यश हा ईशाचं कौतुक करताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

12:06 PM (IST)  •  15 May 2023

Amitabh Bachchan: बिग बींची बाईक राईड; अनोळखी व्यक्तीचा फोटो शेअर करत म्हणले, 'धन्यवाद मित्रा...'

Amitabh Bachchan:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे हार्ड वर्किंग अभिनेत्यांपैकी एक आहेत. बिग बी कोणत्याही चित्रपट किंवा कार्यक्रमाच्या सेटवर वेळेवर पोहचत असतात. नुकताच अमिताभ यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन हे एका अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर बसलेले दिसत आहेत.  बिग बींना त्या  व्यक्तीनं लिफ्ट  दिली. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्या अनोळखी व्यक्तीचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget