एक्स्प्लोर
Advertisement
म्हणून बाहुबली इतकाच भल्लाल मनावर छाप पाडतो..
मुंबई : अमरेंद्र बाहुबली हा 'बाहुबली 2' या चित्रपटाचा नायक आहे, यात तीळमात्र शंका नाही. मात्र जोडीनेच आणखी काही व्यक्तिरेखांनी हा चित्रपट गाजवला आहे. देवसेनेचं सौंदर्य आणि स्वाभिमान घायाळ करतं, तशी न्यायप्रिय शिवगामी मनाला भावते. विश्वासू कटप्पा हे पात्र जितकं जिवंत वाटतं, तितकाच मनात विषाचं बीज पेरल्याने अहंकारी आणि मग्रुर झालेला भल्लालदेव प्रातिनिधीक वाटतो. त्यामुळेच भल्लालदेव ही बाहुबलीतील उत्तमरित्या लिहिली गेलेली एक तगडी व्यक्तिरेखा ठरते.
राजमौली यांच्या बाहुबलीची कथा तशी सरधोपटच. एक महाराजा. त्याच्या भावाच्या मनातली असुया. त्याने आईच्या मनात विष कालवणं. माय-लेकात गैरसमज. गैरसमजातून झालेली हत्या. पापाचं प्रायश्चित्त. वडिलांसारखा दिसणारा मुलगा. पित्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलाने पुन्हा येणं. आईला मिळालेला न्याय आणि खलनायकाचा खात्मा. मात्र सिनेमाची बांधेसूद पटकथा, टाळ्या घेणारे
संवाद आणि प्रत्येक व्यक्तिरेखा ऑन पेपर व्यवस्थित लिहिल्याने टिपीकल कथाही प्रेक्षणीय ठरते.
बाहुबली चित्रपटातला खलनायक अर्थात भल्लालदेवने तुमचं लक्ष वेधून घेतलं नसेल, तरच नवल. अमरेंद्र बाहुबलीला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीची भल्लालला हाव आहे. मग ती देवसेना असो वा माहिष्मतीचं सिंहासन. अमरेंद्र बाहुबलीच्या मृत्यूनंतर 25 वर्ष भल्लाल माहिष्मतीची गादी चालवतो. सत्तेची चटक लागल्याने तो वर्चस्व गाजवण्यासाठी हपापलेला असतो. भल्लालसारख्या जुलमी राजकर्त्याला महेंद्र बाहुबली आव्हान देईपर्यंत माहिष्मतीच्या जनतेवरील अन्याय सुरुच राहतात. एकीकडे बाहुबली हा देवस्वरुप आहे, मात्र भल्लालदेव माणूस असल्याने त्याची व्यक्तिरेखा तितकीच गुंतागुंतीची आणि इंटरेस्टिंग आहे.
एकीकडे बिज्जलदेवला सिंहासन नाकारुन धाकटा भाऊ विक्रमदेवला (अमरेंद्रचे पिता) सम्राट घोषित केलं जातं. आपल्या अपंगत्वामुळे मुकुट नाकारल्याचा समज करुन घेत 'माहिष्मतीचा खरा वारसदार तूच आहेस', असं बिज्जलदेव लेकाच्या मनात भरतात. त्यातच शिवगामीचा सख्ख्या मुलापेक्षा पुतण्यावर असलेला अधिक जीव बिज्जल आणि भल्लालच्या मनातल्या आगीला वारा घालतात. या सर्वाचं द्योतक म्हणजे भल्लालची नकारात्मक व्यक्तिरेखा. भल्लालच्या खल भूमिकेला त्याचं पालनपोषण जबाबदार आहे, हे यातूनच दिसून येतं.
भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं!
कालकेय विरुद्ध युद्ध लढताना भल्लाल स्वतःकडे अधिक शक्तिशाली शस्त्रं ठेवतो. युद्ध जिंकण्यासाठी माणसांच्या जीवाची किंमत त्याला राहत नाही. शिवगामी जेव्हा याच कारणामुळे बाहुबलीच्या राज्याभिषेकाची घोषणा करते, तेव्हा भल्लाल अस्वस्थ होतो. त्यात भल्लालचं दुखावलेपण आहे, नाकारलेपण आहे, असुरक्षिततेची भावना आहे. बाहुबलीच्या पहिल्या भागातील भल्लालच्या याच भावनांमुळे दुसऱ्या भागात त्याची व्यक्तिरेखा अधिक फुलते. आईला इमोशनल ब्लॅकमेल करुन सत्तेच्या नाड्या हाती घेतल्यानंतरही भल्लाल शांत होत नाही. बाहुबलीला मिळणारं जनतेचं प्रेम त्याला अस्वस्थ करतं. बाहुबली हा जनतेच्या मनातला राजा आहे, हे अनेक प्रसंगांतून दिसायला लागतं. राज्याभिषेक सोहळ्यात जनतेच्या 'बाहुबली, बाहुबली'च्या जयजयकाराने माहिष्मती दुमदुमते आणि जमीन थरारुन सिंहासन डळमळतं. याच अस्वस्थतेतून अमरेंद्रच काय, जन्मदात्या आईचे म्हणजेच शिवगामीचे प्राण स्वतःच्या हाताने घेण्यापर्यंत त्याची मजल जाते.‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!
राणा डुग्गुबातीने पुरेपूर न्याय देत भल्लालदेव ही व्यक्तिरेखा वठवली आहे. आवंढा गिळणं, नजरेच्या कटाक्षातून पाहणं, डोळ्यांचा पुरेपूर वापर करत नजरेची भाषा बोलणं, देहबोली, यातून ही व्यक्तिरेखा राणाने हुबेहुब उभी केली आहे. 25 वर्षांनीही त्याने जंगली सांडाला दिलेली झुंज त्याच्या बाहुतलं बळ जराही कमी न झाल्याचं दाखवतं. त्यामुळे शेवटच्या लढाईत महेंद्रशी दोन हात करण्यासाठी स्वतः मैदानात उतरतानाही त्याच्यात आत्मविश्वास दिसतो, किंबहुना मगरुरी दिसते. भल्लालदेव या व्यक्तिरेखेला विविध पदर आहेत. त्याच्या खल व्यक्तिरेखेचं समर्थन देणाऱ्या बारीकसारीक गोष्टी चित्रपटात मांडल्या आहेत. त्यामुळे भल्लालदेव अकारण व्हिलन वाटत नाही. बाहुबली इतकंच भल्लालदेवही मनावर छाप पाडून जातो. एका डोळ्याने अंध असलेला राणा भल्लालदेव साकारताना पाहून, त्याच्याविषयीचा अभिमान ऊर भरुन येतो. ‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.संबंधित बातम्या
मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन
बाहुबलीला मरण्यासाठी 25 कोटी रुपये तर कटप्पाला केवळ....!
'बाहुबली 2' ची चौथ्या दिवशीची कमाई किती?
सलमान-आमीरवर मात, शाहरुखचा विक्रम मोडण्यात प्रभास अपयशी
बाहुबली बनवणारे राजमौली कोण?
सर्व विक्रम मोडीत, ‘बाहुबली 2’ ची विकेंडला ऐतिहासिक कमाई
भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं!
‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई
उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं..
अंडरटेकरची भेट, ते मानधन, ‘बाहुबली’च्या 15 फॅक्ट्स !
‘बाहुबली 2’ पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर मिळणार?
दुबईत ‘बाहुबली 2’ प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं?
‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!
‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक
पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ
कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…
‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट
रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर
VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
परभणी
निवडणूक
Advertisement