एक्स्प्लोर

FIPRESCI: सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांच्या यादीत मराठी चित्रपट का नाही? चित्रपट समीक्षकांकडून खंत व्यक्त

FIPRESCI या संस्थेनं सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली. यादीमध्ये मराठी चित्रपटांच्या नावाचा समावेश नसल्यानं काही चित्रपट समीक्षकांनी खंत व्यक्त केली आहे. 

FIPRESCI: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स अर्थात FIPRESCI या संस्थेनं सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. ही यादी शुक्रवारी (21 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये एकही मराठी चित्रपटाचा समावेश नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यादीमध्ये मराठी चित्रपटांच्या नावाचा समावेश नसल्यानं काही चित्रपट समीक्षकांनी खंत व्यक्त केली आहे. 

'शोले निवड आवडली पण मराठी चित्रपट नाही याची खंत': दिलीप ठाकूर 

चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'या यादीतील शोले ही निवड आवडली. पण एकही मराठी चित्रपटाचं नाव या यादीत नाही, याची खंत वाटते. पिंजरा, माणूस या चित्रपटांचा समावेश या यादीमध्ये व्हायला हवा, असं मला वाटतं. तसेच व्ही . शांताराम यांनी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केला. त्यांच्याही चित्रपटांचा समावेश या यादीत होऊ शकतो. '

गणेश मतकरी यांनी शेअर केली पोस्ट
चित्रपट समीक्षक, निर्माते आणि दिग्दर्शक गणेश मतकरी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, 'FIPRESCI या आंतरराष्ट्रीय चित्रपटांवर लिहिणाऱ्या समीक्षक संघटनेच्या भारतीय शाखेने केलेली, आजवरच्या बेस्ट भारतीय फिल्म्सची ही यादी. 1981 नंतर एकही फिल्म पहिल्या दहात बसणारी झाली नाही आणि सर्व बेस्ट फिल्म सव्वीस वर्षांच्याच कालावधीत झाल्या हे मला पटत नाही. सत्या, कोर्ट, मला फार आवडत नसली तरी स्वदेस, लगान, गॅंग्ज ऑफ वासेपूर यातल्या काही फिल्म्स असणं सहज शक्य होतं. माझा प्रादेशिक सिनेमांचा अभ्यास त्यामानाने कमी आहे, पण नक्कीच त्यात इतरही उत्तम फिल्म असतीलच. ही लिस्ट फार टिपिकल आहे. या सर्व फिल्म्स चांगल्या आहेत, पण यादी करताना अधिक सर्वसमावेशक विचार आवश्यक होता.' 

FIPRESCI या संस्थेनं सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची निवड करण्यासाठी तीस सदस्यांनी गुप्तपणे मतदान केले. त्यानंतर सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये चार बंगाली, चार हिंदी, एक मल्याळम आणि एक कन्नड चित्रपटाचा समावेश आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स या संस्थेनं ही यादी आता चर्चेचा विषय ठरत आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

FIPRESCI कडून सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी जाहीर; हिंदी, बंगाली चित्रपटांचा समावेश पण मराठी एकही नाही!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget