एक्स्प्लोर

FIPRESCI कडून सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी जाहीर; हिंदी, बंगाली चित्रपटांचा समावेश पण मराठी एकही नाही!

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स अर्थात FIPRESCI या संस्थेनं सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची निवड केली आहे. ही यादी शुक्रवारी (21 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली.

FIPRESCI: आपल्या देशात दरवर्षी वीसपेक्षा जास्त भाषांतील चित्रपटांची निर्मिती होत असते. विविध विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांना बघायला आवडतात. भारतीय भाषांमधील सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांची निवड करणे अतिशय अवघड गोष्ट आहे. हे काम आता FIPRESCI या संस्थेनं केलं आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स अर्थात FIPRESCI या संस्थेनं सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. ही यादी शुक्रवारी (21 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये एकही मराठी चित्रपटाचा समावेश नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

FIPRESCI या संस्थेनं  सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची निवड करण्यासाठी तीस सदस्यांनी गुप्तपणे मतदान केले. त्यानंतर सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये चार बंगाली, चार हिंदी, एक मल्याळम आणि एक कन्नड चित्रपटाचा समावेश आहे.

दहा सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी-
1) 'पथेर पांचाली'-
पथेर पांचाली हा चित्रपट 1955 मध्ये प्रदर्शित झाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सत्यजित रे यांनी केले आहे. अनेक चित्रपट समीक्षक या चित्रपटाचं आजही कौतुक करतात. 
2) 'मेघा धाका तारा'  -
ऋत्विक घटक दिग्दर्शित मेघा धाका तारा हा चित्रपट 1960 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अभिनेत्री सुप्रिया देवी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 
3) भुवन शोम-

मृणाल सेन दिग्दर्शित भुवन शोम हा हिंदी चित्रपट 1969 मध्ये दिग्दर्शित झाला.

4)  एलिप्पाथायम-

एलिप्पाथायम या चित्रपटाचं दिग्दर्शन अदूर गोपालकृष्ण यांनी केलं. हा मल्याळम भाषेतील चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला. 

5) 'घटश्राध्द'

गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केलेला 'घटश्राध्द ' हा कन्नड चित्रपट 1977 मध्ये प्रदर्शित झाला. 

6) 'गरम हवा' ( हिंदी चित्रपट. १९७३.)

1973 मध्ये रिलीज झालेल्या 'गरम हवा' या चित्रपटाचं दिग्दर्शन एम. एस. सत्थू  यांनी केले. या चित्रपटात बलराज साहनी, फारुख शेख, गीता सिद्धार्थ या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

7) 'चारुलता'

सत्यजित राय दिग्दर्शित हा बंगाली चित्रपट 1964 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात  सौमित्र चटर्जी, माधबी मुखर्जी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली

8) 'अंकूर ' 

श्याम बेनेगल दिग्दर्शित अंकूर हा हिंदी चित्रपट 1974 मध्ये प्रदर्शित झाला.  अनंत नाग,शबाना आझमी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  
9) 'प्यासा ' 

गुरुदत्त दिग्दर्शित प्यासा हा चित्रपट 1956 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मती, पटकथा लेखन हे देखील गुरुदत्त यांनी केलं असून या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका देखील साकारली आहे. 

10)  'शोले'

1975 साली प्रदर्शित झालेला शोले हा चित्रपट आजही सिनेप्रेमी आवडीनं बघतात. बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असणारा शोले हा चित्रपट  1975 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले. अमिताभ बच्चन, धमेंद्र, हेमा मालिनी अशी तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स या संस्थेनं ही यादी आता चर्चेचा विषय ठरत आहे. या यादीमध्ये एकही मराठी चित्रपट नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 22 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget