Baipan Bhaari Deva: 'मराठी चित्रपटांना लोक...'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं महेश मांजरेकरांकडून तोंडभरुन कौतुक
अभिनेते महेश मांजरेकर यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
![Baipan Bhaari Deva: 'मराठी चित्रपटांना लोक...'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं महेश मांजरेकरांकडून तोंडभरुन कौतुक Baipan Bhaari Deva Mahesh Manjrekar praised the movie share video on social media Baipan Bhaari Deva: 'मराठी चित्रपटांना लोक...'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं महेश मांजरेकरांकडून तोंडभरुन कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/12/74a7a9086874b7c5dd5dc95dee5cc7eb1689159166378259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील गाणी, चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अनेक प्रेक्षक आणि सेलिब्रिटी या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन बाईपण भारी देवा या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
महेश मांजरेकर यांनी शेअर केला व्हिडीओ
महेश मांजरेकर यांनी 1 जुलै रोजी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यामातून त्यांनी बाईपण भारी देवा चित्रपटाचे कौतुक केले. ते म्हणाले, 'मी पाहिला आहे हा चित्रपट हा चित्रपट खूप छान आहे. बाईपण भारी देवा म्हणजे बायकांचा सिनेमा आहे, असं तुम्हाला वाटेल. पण असं नाहीये.हा सिनेमा पुरुषांनी बघणं देखील गरजेचं आहे. प्रेक्षकांचे अभिनंदन, कारण तुम्ही हे पटवून दिलं आहे की, मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत हे सगळं अफवा आहे, चांगला सिनेमा असेल तर तुम्ही येता. ' महेश मांजरेकर यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'भारीच आहे बाबा हा सिनेमा!'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
View this post on Instagram
बाईपण भारी देवा चित्रपटाची स्टार कास्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)