एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva: 'सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत. एक पवारांचे आणि दुसरे आमचे!'; केदार शिंदे यांनी शेअर केली खास पोस्ट

नुकतीच केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील गाणी, चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं आहे. नुकतीच केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

केदार शिंदे यांनी अजित भुरे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. आयएनटी.. 1993. माझी "बॅाम्ब एक मेरी जान" एकांकिका तेव्हा अंतिम फेरीत होती. निकालाची वेळ आणि त्याला लागणारा वेळ! यात हळूहळू पोरं पोरी आरडाओरडा करू लागली.. एकच जयघोष.. भुरे काका पडदा उघडा, पडदा उघडा!!! भुरे काका, ही त्याची माझी पहिली ओळख. पण पुढे व्यावसायिक रंगभूमीवर काम सुरू केलं आणि भुरे काकाचा तो, अजितदादा झाला. सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत. एक पवारांचे आणि दुसरे आमचे! अजित भुरे!! ही प्रस्तावना लिहिली अशासाठी की, #baipanbhaarideva #बाईपणभारीदेवा या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत या माणसाचा मोठा हात आहे. तो या सिनेमाचा सह निर्माता आहेच पण, या प्रवासात त्याची मला खुप साथ लाभली. गेली ४ वर्ष हा सिनेमा थांबला तेव्हा मला धीर देणारा अजितदादा होता. त्याआगोदर जेव्हा कुणीही निर्माता या सिनेमासाठी तयार होत नव्हता तेव्हा, केदार आपण हा सिनेमा करायचा.. असं म्हणणारा अजितदादा होता. सिनेमा कुणी एकटा करत नाही म्हणून त्याचं यशही एकट्याने घ्यायचं नसतं. ते कृतघ्नपणाचं लक्षण आहे. स्वामींचे आभार की, ते विविध रूपात माझ्या पाठीशी आहेत. आता उद्या आणखी एक महत्त्वाची व्यक्ती!! जीच्या मुळे ही कल्पना निर्माण झाली.'

View this post on Instagram
 
A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,दीपा परब, सुकन्या कुलकर्णी,सुचित्रा बांदेकर, सुरुची अडारकर, शिल्पा नवलकर आणि शरद पोंक्षे या कलाकारांनी बाईपण भारी देवा या चित्रपटात काम केलं आहे.

संंबंधित बातम्या

Kedar Shinde : प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय 'बाईपण भारी देवा'; 'सिध्दीविनायकाचा महाप्रसाद' म्हणत केदार शिंदेंनी मानले आभार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget