एक्स्प्लोर

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर मिळणार?

मुंबई : कटप्पाने बाहुबली को क्यों मारा या, बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अनेक प्रेक्षक ‘बाहुबली स्पॉयलर्स’ टाळण्यासाठी सोशल मीडियावरील पोस्ट्स, ‘बाहुबली’ हा शब्दही दिसणारे मेसेज किंवा बातम्या, रिव्ह्यूज टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईत प्रेक्षक मॉर्निंग वॉक सोडून सिनेमा पाहण्यासाठी गेले आहेत. राज्यभरात हीच परिस्थिती आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोल्हापुरातही प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 'बाहुबली : द बिगिनिंग' हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती. बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत. दुबईत 'बाहुबली 2' प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं? दुबईतील प्रेक्षकांना कटप्पाचं गुपित उलगडलं असून दुबईतील समीक्षकांनी चित्रपटाला 5 स्टार आणि स्टँडिंग ओव्हेशन दिलं आहे. बाहुबली 2 म्हणजे ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’चा पहिला-वहिला रिव्ह्यू समोर आला आहे. उमैर साधू या यूके, यूएईमधील सेन्सॉर बोर्डाचा सदस्य आणि समीक्षकाने सिनेमाचा रिव्ह्यू दिला आहे. ट्विटरवर उमैरने दिलेल्या माहितीनुसार त्याने बाहुबली 2 ला पाच स्टार्स दिले आहेत. हॉलिवूडमधील लेजेंडरी चित्रपट लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि हॅरी पॉटरशी उमैरने बाहुबली 2 ची तुलना केली आहे. अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रभासवर त्याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय भल्लालदेव साकारणारा राणा डुग्गुबाती, रम्या कृष्णनने साकारलेली शिवगामी या व्यक्तिरेखाही मनावर छाप पाडून जात असल्याचं त्याने सांगितलं आहे. बाहुबली 2 मधील उत्तुंग सेट्स, व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर, ध्वनी, संकलन, छायाचित्रण यासारख्या तांत्रिक बाबींवरही उमैरने स्तुतिसुमनं उधळली आहेत. त्याचप्रमाणे कथा, पटकथा, संवाद, संगीतही अत्युच्च दर्जाचं असल्याचं त्याने सांगितलं आहे. या चित्रपटाची भविष्यात क्लासिक्समध्ये गणना होईल, असा विश्वासही उमैरने व्यक्त केला आहे. संबंधित बातम्या :

‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!

‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक

पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…

‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट

रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha Trailer Release: 'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
Rakul Preet Singh On Surpanakha Character Ramayana Movie: 'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज... तिच्यामुळेच युद्धाची सुरुवात झाली...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Sankarshan Karhade Grandfather: तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget