एक्स्प्लोर

बाहुबली 2 ने याड लावलं! पहिल्या आठवड्यात विक्रमी कमाई

मुंबई : 'बाहुबली 2' चित्रपटाने देशभरातीलच नव्हे, तर परदेशातील चित्रपट रसिकांनाही वेड लावलं आहे. पहिल्या आठवड्यात 'बाहुबली 2' ने 860 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे 800 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'बाहुबली 2' हा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे केवळ एका आठवड्यातच ही विक्रमी कमाई झाली आहे. 'बाहुबली 2' चा भारतासह जगभरातील पहिल्या आठवड्यातील कमाईचा आकडा 860 कोटींवर गेला आहे. यामध्ये हिंदी भाषेतील आवृत्तीने 500 कोटी रुपयांचा वाटा उचलला आहे. पहिल्या आठवड्याच्या कमाईत बाहुबली 2 ने सलमानच्या सुलतानचा रेकॉर्ड मोडला आहे. सुलतानने पहिल्या आठवड्यात 208.82  कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे, आमीर खानच्या 'दंगल' चित्रपटाचा विक्रमही मोडित निघाला आहे. दंगल चित्रपटानं आतापर्यंत एकूण 744 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मात्र बाहुबली 2 ने बॉक्स ऑफिसवर ऑल टाईम ग्रॉसिंगमध्ये नवा विक्रम रचला आहे. पहिल्या आठवड्यात 'दंगल'ने 197.54 कोटी कमावले होते. चित्रपट क्षेत्रातील जाणकार रमेश बाला यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. (भारतातील निव्वळ कमाई - ₹ 545 कोटी) बाहुबली 2 ची भारतातील एकूण कमाई - ₹ 695 कोटी ओव्हरसीज कमाई -  ₹ 165 कोटी एकंदर कमाई  - ₹ 860 कोटी https://twitter.com/rameshlaus/status/860312309440425988 ऑनलाईन तिकीट बुकींगमधील अग्रगण्य वेबसाईट असलेल्या 'बुकमायशो'ने दिलेल्या माहितीनुसार देशभरात प्रत्येक सेकंदाला 'बाहुबली 2'ची 12 तिकीटं बुक केली जात आहेत. https://twitter.com/rameshlaus/status/860316551899041792

रेकॉर्ड ब्रेक बाहुबली 2

सलमानच्या सुलतानला धोबीपछाड

पहिल्या आठवड्याच्या कमाईत बाहुबली 2 ने सलमानच्या सुलतानचा रेकॉर्ड मोडला आहे. सुलतानने पहिल्या आठवड्यात 208.82  कोटींची कमाई केली होती. बाहुबली 2 चा जगभरातील पहिल्या आठवड्यातील कमाईचा आकडा 860 कोटींवर गेला आहे. पहिल्या आठवड्याच्या कमाईतील टॉप 6 चित्रपट
1. बाहुबली 2 860 कोटी 28 एप्रिल 2017
2. सुलतान 208.82 कोटी 6 जुलै 2016
3. दंगल 197.54 कोटी 23 डिसेंबर 2016
4. धूम 3 188.99 कोटी 20 डिसेंबर 2013
5. बजरंगी भाईजान 184.65 कोटी 17 जुलै 2015
6. पीके 183.09 कोटी 19 डिसेंबर 2014

आमीरच्या पीके-दंगलचा विक्रम मोडित

ऑल टाईम सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत बाहुबली 2 नंबर वन आहे. बाहुबली (860 कोटी), पीके (792 कोटी), दंगल (744 कोटी) अशी क्रमवारी आहे. त्यामुळे ऑल टाईम कमाईत मिस्टर परफेक्शनिस्टचं असलेलं वर्चस्व मोडित निघालं आहे. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावरही बाहुबली 1 आहे. या चित्रपटाने एकूण 650 कोटी कमवले होते.

शाहरुखचा विक्रम मोडण्यात मात्र प्रभास अपयशी

ओपनिंग डेच्या कमाईत मात्र हिंदी ‘बाहुबली 2’ शाहरुख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या तुलनेत तोकडा पडला. ‘हॅपी न्यू इयर’ने पहिल्या दिवशी 45 कोटी, तर बाहुबली 2 ने 41 कोटी कमवले होते.

मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन

बाहुबली 2 नं पहिल्याच दिवशी भारतात एकूण (सर्व भाषा मिळून) 121 कोटींची कमाई केली होती. यात हिंदीतील 41 कोटींशिवाय, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम यांच्या एकूण 80 कोटींच्या कमाईचा समावेश आहे. हिंदी भाषेत बाहुबली 2 ला दीडशे कोटींचा टप्पा पार करण्यास चार दिवस (28 एप्रिल ते 1 मे – एक्स्टेंडेड वीकेंड) लागले. सलमान खानच्या सुलतान चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटी रुपये जमवले, तर दंगलने 29.78 कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे साहजिकच हिंदीत आमीर-सलमानचे ओपनिंग डे चे रेकॉर्ड प्रभासकडून मोडित निघाले. मात्र ओपनिंग डेला हिंदी ‘बाहुबली 2’ शाहरुख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या तुलनेत तोकडा पडला. ‘हॅपी न्यू इयर’ने पहिल्या दिवशी 45 कोटी, म्हणजेच बाहुबली 2 पेक्षा 4 कोटी जास्त कमवले होते. ओपनिंग वीकेंड (एक्स्टेंडेड वीकेंड) ची बाहुबली 2 ची भारतातील कमाई : पहिला दिवस – शुक्रवार 28 एप्रिल – 41 कोटी दुसरा दिवस – शनिवार 29 एप्रिल – 40.5 कोटी तिसरा दिवस– रविवार 30 एप्रिल- 46.5 कोटी चौथा दिवस – सोमवार 1 मे – 40.25 कोटी 'बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.

संबंधित बातम्या

मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन

म्हणून बाहुबली इतकाच भल्लाल मनावर छाप पाडतो..

बाहुबलीला मरण्यासाठी 25 कोटी रुपये तर कटप्पाला केवळ….!

‘बाहुबली 2’ ची चौथ्या दिवशीची कमाई किती?

सलमान-आमीरवर मात, शाहरुखचा विक्रम मोडण्यात प्रभास अपयशी

बाहुबली बनवणारे राजमौली कोण?

सर्व विक्रम मोडीत, ‘बाहुबली 2’ ची विकेंडला ऐतिहासिक कमाई

भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं!

‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं..

अंडरटेकरची भेट, ते मानधन, ‘बाहुबली’च्या 15 फॅक्ट्स !

‘बाहुबली 2’ पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर मिळणार?

दुबईत ‘बाहुबली 2’ प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं?

‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!

‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक

पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…

‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट

रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget