![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पूजाची भूमिका साकारून सगळा गोंधळ उडवणे हे आव्हानात्मक; 'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर रीलिज झाल्यानंतर आयुष्मान खुराणाची प्रतिक्रिया
Ayushmann Khurrana: 'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर वेड लावणारा असून पूजाची भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं असं या चित्रपटाचा अभिनेता आयुष्मान खुराणा म्हणाला.
![पूजाची भूमिका साकारून सगळा गोंधळ उडवणे हे आव्हानात्मक; 'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर रीलिज झाल्यानंतर आयुष्मान खुराणाची प्रतिक्रिया Ayushmann Khurrana on Dream Girl 2 says it was challenging to cause all the confusion bollywood marathi news पूजाची भूमिका साकारून सगळा गोंधळ उडवणे हे आव्हानात्मक; 'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर रीलिज झाल्यानंतर आयुष्मान खुराणाची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/01/84c685b99af8a182b7c41a28e058692b1690902059418646_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dream Girl 2: बहुचर्चित चित्रपट ड्रीम गर्ल 2 चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) पूजाच्या वेशात पुन्हा एकदा धमाल नाटकासह चाहत्यांची गर्दी खेचण्यासाठी तयार झाला आहे. 1 ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला असून त्याची आता सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटातील पूजाची भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं अशी प्रतिक्रिया आयुष्मान खुराणाने दिली आहे.
अलीकडे लॉन्च करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभत असल्याचं दिसून येतंय. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर या चित्रपटाचा अभिनेता आयुष्मान खुराणा याने म्हटलं आहे की, ड्रीम गर्लचा पहिला पार्ट तर ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्या भागामुळे आता सिक्वेलकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. 'ड्रीम गर्ल 2'चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटतो. माझे चाहते मोठ्या पडद्यावर फिल्म पाहतात, तेव्हा त्यांचं भरपूर मनोरंजन होईल हे बघून समाधान वाटतं. मी सिनेमात साकारलेली पूजा लोकांच्या पसंतीस उतरली हे पाहून मला समाधान वाटत आहे. एखाद्या मुलीची वेषभूषा करून सगळा गोंधळ उडवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करणं माझ्यासाठी मोठी जोखीम होती. माझा हा अवतार लोकांना आवडतो याचा मला खरोखर आनंद वाटतो. एखाद्याला हसवण्याची कामगिरी खूप मोठी असते. हा सिनेमा प्रेक्षकांना निराळा अनुभव देणारा ठरेल."
Thank you for such a DREAM-y evening ✨🙏🏻❤️#DreamGirl2 in Cinemas on 25th August. pic.twitter.com/p06s5nHYz9
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) August 3, 2023
'ड्रीम गर्ल-2' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामधील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता 'ड्रीम गर्ल-2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट राज शांडिल्य यांनी दिग्दर्शित केला आहे. एकता आर कपूर आणि शोभा कपूर निर्मित 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबतच अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, विजय राज आणि राजपाल यादव हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
View this post on Instagram
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)