एक्स्प्लोर
Sonakshi-Zaheer Wedding: सलमान खानला ही दिलंय कर्ज, सोनाक्षीचं सासर किती आहे श्रीमंत?
Sonakshi-Zaheer : सोनाक्षी सिन्हा ही आपला प्रियकर झहीर इक्बालसोबत विवाहबद्ध झाली आहे. या जोडप्याने अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केला. त्यानंतर या जोडप्याने ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले.
Sonakshi-Zaheer Wedding: सोनाक्षी सिन्हा ही आपला प्रियकर झहीर इक्बालसोबत विवाहबद्ध झाली आहे. या जोडप्याने अत्यंत साध्या पद्धतीने नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर या जोडप्याने ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते.
1/10

सोनाक्षी सिन्हा आता रतनसी कुटुंबाची सून झाली आहे. रतनसी कुटुंबाचे व्यावसायिक जगतात मोठे नाव आहे.
2/10

सोनाक्षीच्या सासऱ्यांचे नाव इक्बाल रतनासी आहे. ते मुंबईतील असून त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव झहीर इक्बाल असून तो अभिनेता आहे. तर, धाकट्या मुलाचे नाव मोहम्मद लाढा असून मुलीचे नाव सनम रतनसी आहे. सनम ही एक प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आहे.
3/10

इक्बाल रतनसी हे प्रसिद्ध ज्वेलर्स आणि व्यावसायिक आहे. त्याशिवाय, त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मनोरंजन जगतातही त्यांचे नाव प्रसिद्ध आहे.
4/10

सोनाक्षीचे सासरे इक्बाल रतनसी यांनी स्टेमॅक डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 2005 मध्ये केली होती. 2011 पर्यंत ते या कंपनीचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी ब्लॅक स्टोन हाउसिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली.
5/10

इक्बाल रतनसी यांची आणखी एक कंपनी आहे. ही कंपनी टूल्स, लाइट्स आणि इतर साहित्याचा पुरवठा करते.
6/10

इक्बाल रतनसीची सलमान खानशी 80 च्या दशकापासून घट्ट मैत्री आहे. झहीर इक्बालचे वडील इक्बाल यांनी सलमानला खूप मदत केली होती. इक्बाल रतनसीने सलमानला जेव्हा-जेव्हा त्याची गरज होती तेव्हा त्याला साथ दिली.
7/10

1980 मध्ये सलमान खाननेही इक्बालकडून आर्थिक मदत घेतली होती. याबाबत खुद्द सलमान खानने सांगितले होते. पोस्ट शेअर करून सलमानने इक्बाल ही आपली पर्सनल बँक असल्याचे सांगितले होते. यामुळेच झहीर इक्बाललाही सलमान खानने लाँच केले होते.
8/10

सोनाक्षीचा पती झहीर इक्बालबने सलमान खान निर्मित "नोटबुक" या रोमँटिक चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिवंगत अभिनेत्री नूतनची नात प्रनूतन बहलसोबत त्याने स्क्रीन शेअर केली. झहीरने 2014 मध्ये आलेल्या "जय हो" चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून पडद्यामागेही काम केले आहे. सोनाक्षीसोबत डबल एक्सएलमध्येही झहीरने काम केले होते.
9/10

जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार, झहीरची एकूण संपत्ती ही एक-दोन कोटींच्या घरात आहे. यामध्ये त्याच्या कौटुंबिक व्यवसायाच्या कमाईचा समावेश नाही.
10/10

झहीर हा चित्रपटांशिवाय जाहिरात आणि ब्रॅण्ड एंडोर्समेंटच्या माध्यमातून कमाई करतो.
Published at : 24 Jun 2024 02:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























