Ashwini Mahangade: 'संकटांशी दोन हात करून...'; अश्विनी महांगडेच्या पोस्टनं वेधलं लक्ष
नुकतीच अश्विनीनं (Ashwini Mahangade) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) ही विविध विषयांवर आधारित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. अश्विनी ही आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये अनघा ही व्यक्तिरेखा साकरते. या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतीच अश्विनीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
अश्विनी महांगडे
अश्विनीनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती स्टेजवर भाषण देताना दिसत आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, तुमचे तेव्हाच ऐकले जाते जेव्हा तुमचे विचार परिपक्व असतात. तुम्हाला मान तेव्हाच मिळतो जेव्हा संकटांशी दोन हात करून तुम्ही पुढे येता. बोलणाऱ्याने बोलत राहावे. ऐकणाऱ्याने ऐकत राहावे. तुम्ही मात्र चालत राहावे.' अश्विनीनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
अश्विनीनं 'या' मालिकांमध्ये काम केलं
अश्विनीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अश्विनीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अस्मिता, माधुरी मिडल क्लास कल्पतरू, लक्ष्य, ब्रह्मांडनायक, आणि सावर रे या मालिकांमध्ये देखील अश्विनीनं काम केलं.
अश्विनी (Ashwini Mahangade) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 237K फॉलोवर्स आहेत. विविध लूकमधील फोटो अश्विनी सोशल मीडियावर शेअर करते. अश्विनी ही आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत ती अनघा ही भूमिका साकरते. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: