Ashwini Mahangade: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीची खास पोस्ट; म्हणाली, 'नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर...'
अश्विनीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti ) जयंतीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) ही आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये अनघा ही व्यक्तिरेखा साकरते. अश्विनीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अश्विनी ही सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. अश्विनीनं नुकतीच छत्रपती संभाजी महाराज यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti ) जयंतीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अश्विनी महांगडेने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक फोटो इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला अश्विनीनं कॅप्शन दिलं, 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा. छत्रपती संभाजी महाराज ज्यांना समजले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले. त्यांना समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर काळजात निष्ठा असावी लागते. "शौर्यपीठ" कथा सांगते राजाची. नुसते त्या भूमीत उभे राहिले तर डोळे पाणावतात. ही भावना त्यांनाच समजू शकते जे एकदा तरी तिथे गेले आहेत.'
अश्विनीनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
अश्विनीनं 'स्वराज्य रक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) या मालिकेत राणू आक्काराजे ही भूमिका साकारली होती. अश्विनीनं महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटात देखील काम केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सध्या अश्विनी ही आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत ती अनघा ही भूमिका साकरते. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: