(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashok Saraf Exclusive : अशोक सराफ लोकसभा निवडणूक लढवणार? मामा म्हणाले,"राजकारणं करणं मला..."
Ashok Saraf : अशोक सराफ यांना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला असून आता त्यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल (Lok Sabha Election 2024) भाष्य केलं आहे.
Ashok Saraf on Lok Sabha Election 2024 : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) सध्या विविध कारणाने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दुसरीकडे त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशातच आता महाराष्ट्राच्या लाडक्या मामांनी राजकारण (Maharashtra Politics) आणि लोकसभा निवडणुकीबद्दल (Lok Sabha Election 2024) भाष्य केलं आहे.
अशोक सराफ 'लोकसभा निवडणूक 2024' लढवणार? (Ashok Saraf on Lok Sabha Election 2024)
लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल एबीपी माझाशी बोलताना अशोक सराफ म्हणाले,"राजकारण हे आपलं काम नाही. ज्यात आपल्याला कळत नाही त्यात काम करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तरी त्याचा काहीही उपयोग नाही".
अशोक सराफ पुढे म्हणाले,"आपण जे काम करतो त्याबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. राजकारण आणि माझा काहीही संबंध नाही. आजवर माझ्या क्षेत्रात मी कधी राजकारण केलेलं नाही. मला खरचं राजकारणातलं काही कळत नाही. त्यामुळे 'लोकसभा निवडणूक 2024' लढवण्याचा माझा काहीही विचार नाही".
अशोक सराफ यांची कारकीर्द
अशोक सराफ यांनी आजवर अनेक हिंदी-मराठी सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विनोदी भूमिका साकरण्यासह खलनायकी भूमिका देखील त्यांनी तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत. उत्तम हावभाव, विनोदाचं कमाल टायमिंग अशा अनेक गोष्टींमुळे ते सुपरस्टार झाले आहेत. नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, अशी ही बनवाबनवी, भुताचा भाऊ असे त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. अशोक सराफ सध्या 'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली असून प्रेक्षकांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे.
'लोकसभा निवडणूक 2024'च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशात 19 एप्रिल ते 1 जून अशा सात टप्प्यात तर महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 25 मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. हा लोकसभा निवडणूक निकाल 4 जून 2024 रोजी असणार आहे. 'लोकसभा निवडणूक 2024'साठी सध्या अनेक सेलिब्रिटींना विचारणा होत आहे. सेलिब्रिटींनी आजवर जनसेवेची अनेक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने (Thalapahy Vijay) काही दिवसांपूर्वी राजकारणात एन्ट्री केली आहे. अशातच आता लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी भाजपचं (BJP) कमळ हाती घेतलं आहे.
संबंधित बातम्या