Suresh Dhas: त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांच्यावर टीकेची तोफ डागली.
नागपूर: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा मुद्दा भाजप आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही लावून धरला. त्यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे थेटपणे नाव घेण्यास नकार दिला. मात्र, संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांचा सहभाग असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील, असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले. ते शनिवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी सुरेश धस यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सहभागावरुन सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा सुरेश धस यांनी म्हटले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणात या सदनाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे जे बोलले आहेत, त्यापुढे मी बोलू शकत नाही. काल एसआयटी स्थापनेची घोषणा झाली आहे. आज दुपारपर्यंत आदेश निघेल. मी अजून कोणाचं नाव घेतलेलं नाही, फक्त आका म्हटलंय. विष्णू चाटे अँड गँगचा आका, हे आका चौकशीत नाव पुढे आले तर आका आपोआप बिनभाड्याच्या खोलीत जातील. जितेंद्र आव्हाड यांनी कोणाचे नावे घेतले मला माहिती नाही. दसरा मेळाव्याच्या दिवशी हे जे आका आहेत, ती पंकजा मुंडेंनी सांगितली आहे. ही ओळख काय आहे, ती मी नाही, पंकजा ताईंनी भगवान भक्तीगडावर सांगितली आहे, असा उल्लेख सुरेश धस यांनी केला.
पंकजा मुंडेंनी म्हटले होते, कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही, तुमचा इशारा तिकडे आहे का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी धस यांना विचारला. यावर धस यांनी म्हटले की, माझा इशारा धनंजय मुंडेकडे नाही. पण आका याप्रकरणात असतील हे 100 टक्के खरे आहे. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय देशमुखांनी काही ऑर्डर सोडली असेल मला वाटत नाही आणि सोडली असेल तर आकांसोबत आकांचे आकाही आत जातील, असे सुरेश धस यांनी म्हटले.
ज्ञानराधा मल्टिस्टेट संस्थेच्या बायकोला 36 बॉडीगार्ड, एवढे अंगरक्षक मलाही नाहीत: सुरेश धस
सुरेश धस यांनी शनिवारी बीड जिल्ह्यातील मल्टिस्टेट सहकारी संस्था आणि महालक्ष्मी मल्टिस्टेट संस्थेतील गैरव्यवहाराबाबतही भाष्य केले. महालक्ष्मी मल्टिस्टेट मध्ये लोकांचे 5 हजार कोटी रुपये अडकले आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये मिळून तब्बल 16 हजार लोकांचे पैसे अडकले आहेत. यामुळे अनेक मुलींची लग्न लांबली आहेत. आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये 3 हजार 700 कोटी रुपये अडकले आहेत. यांच्या संचालकाच्या पत्नीला 36 बॉडीगार्ड होते, मलाही इतके बॉडीगार्ड नाहीत. यासंदर्भात 5 हजार 500 कोटी रुपयांच्या ठेवी मिळायला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालकांची संपत्ती जप्त केली पाहिजे. हा संघटित गु्न्हेगारीतील मोठा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणातली आरोपांनी मकोका लावावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. बीड जिल्ह्यातील एडीआर आणि डीडीआर , जिथे शाखा उघडल्यात तेथील एआर यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी करणार आहे.
सुरेश धस आणखी काय म्हणाले?
* मराठवाडा वॉटर ग्रीड आमच्यासाठी महत्त्वाची योजना होती, पण तिला कट मारली.
* आरोपीच्या पिंजऱ्यात ही योजना ठेवली
* योजनेचा बोरा वाजवण्याचे काम तत्कालीन सरकारने केले
* जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची वल्गना समोरच्या बाजूने केली
* एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व या योजना सुरु करत गती दिली
* माझ्या मतदारसंघात ९६ टक्के लागवडीसाठी क्षेत्र कृष्णा खोऱ्यात तर ४ टक्के हे गोदावरी खोऱ्यात येते
* कृष्णा पाणी तंटा लवाद २००५ पासून केला
* विलासराव देशमुख व पद्मसिंह पाटील यांपासून ही योजना सुरु आहे
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संकटमोचक गिरीश महाजन येथे आहेक
* मुख्यमंत्री यांना विनंती आहे, ५० हजार हेक्टर अंतर्गत परवानगी ही नागपूर येथे मिळते
* माझ्या मतदारसंघातील २७ हजार ४६२ एकरची योजना आहे
* सुधारित प्रशासकीय मंजूरी देवेंद्र फडणवीस यांनी दिली
* पण ४ टीएमसी पाणी अद्याप आम्हाला मिळाले नाही
* गतीमान निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहे
* दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना विनंती आहे
* आघाडीने नेहमीच आमच्याकडे वक्र दृष्टीने पाहिले आहे
* आम्हाला फडणवीस, शिंदे व पवारांकडून अपेक्षा आहे
* आम्हाला हक्काचे पाणी मिळाले नाही
* जायकवाडी पाणी साठी कायदा दाखवला जातो
* सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर पाणी मिळते
* आम्ही एवढे कसले पाप केले आहे?
* कोण कोणत्या पक्षाचे हे पाहू नका, धाराशिवला आम्ही सगळेच पाया पडायला जातो
* रामदराला विलासराव देशमुख यांनी उद्घाटन केले
* पाच टर्म आम्ही काम करतोय
* आता पुढच्या पिढीला काम शिल्लक ठेवू नका
* मांजरा मध्ये पाणी जाणार आहे
* लातूरला लाखो लोक येतात आहे
* त्यांना पाणी मिळाले पाहिजे
* अभिमन्यु पवार येथे नाहीत, ते शॅडो सीएम आहेत आमचे
* आता दोन शॅडो सीएम झाले आहेत
* दुसरे सुमित वानखेडे आहेत
* तिसरे उभे राहिले होते
* खतगावकर हे शिंदे यांचे शॅडो सीएम होते
* पण ते निवडून आले नाहीत
* शिंदे साहेब त्यांना नको म्हणाले होते
आणखी वाचा
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार