Video : रशियात गगनचुंबी इमारतीवर आठ ड्रोन हल्ले, अमेरिकेत थरकाप उडवणारा अन् लादेनची आठवण करून देणारे भयावह हल्ले
Drones UAV attack high rise buildings in Kazan : रशियन राज्य वृत्त एजन्सी TASS ने मॉस्कोच्या पूर्वेला सुमारे 800 किमी अंतरावर असलेल्या कझानमधील निवासी संकुलावर ड्रोन हल्ल्याची माहिती दिली.
Drones UAV attack high rise buildings in Kazan : रशियातील कझान शहरात 9/11 सारखा हल्ला झाला आहे. कझानमधील तीन मोठ्या इमारतींवर ड्रोन हल्ला झाला. इमारतींवर ड्रोन मारल्याचे फुटेजही समोर आले आहे. त्यामुळे रशियात खळबळ उडाली आहे. कझान विमानतळ देखील तात्पुरते बंद करण्यात आले. विमानांच्या आगमन आणि प्रस्थानावर बंदी घालण्यात आली आहे. रशियाच्या एव्हिएशन वॉचडॉग Rosaviatsia यांनी शनिवारी टेलिग्राम मेसेजिंग ॲपद्वारे सांगितले की, शहरावर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
UAVs have hit at least three high-rise buildings in Kazan, Russia
— NEXTA (@nexta_tv) December 21, 2024
Photos and videos from the scene are being shared on local Telegram channels. pic.twitter.com/MN19u47uom
उंच इमारतींवर आठ ड्रोन हल्ले
रशियन राज्य वृत्त एजन्सी TASS ने मॉस्कोच्या पूर्वेला सुमारे 800 किमी अंतरावर असलेल्या कझानमधील निवासी संकुलावर ड्रोन हल्ल्याची माहिती दिली. एजन्सीने सांगितले की निवासी उंच इमारतींवर आठ ड्रोन हल्ले झाले आहेत. एजन्सींनी स्थानिक अधिकाऱ्यांचा हवाला देऊन सांगितले की कोणतीही जीवितहानी झाली नाही. रशियाच्या सुरक्षा सेवांशी जोडलेल्या बाजा टेलिग्राम चॅनेलने एक असत्यापित व्हिडिओ फुटेज देखील जारी केले आहे. यामध्ये ड्रोन एका उंच इमारतीला धडकताना दिसत आहे. ड्रोन आदळताच मोठा आगीचा गोला निर्माण होऊन इमारतीचे नुकसान झालेले दिसते.
Russia witness 9/11 style attack!
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) December 21, 2024
Drones/UAV's attack high-rise buildings in Kazan, residents evacuated, Alert Sounded pic.twitter.com/PMHthxQBxh
युक्रेनवर रशियाचा आरोप
हल्ल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप केला. युक्रेनने ही मोठी चूक केल्याचे रशियाने म्हटले आहे.
JUST IN: 🇺🇦🇷🇺 Ukrainian drone hits building in Kazan, Russia. pic.twitter.com/a02qdRcCBT
— BRICS News (@BRICSinfo) December 21, 2024
कझान या वर्षी चर्चेत होता
रशियन शहर कझान 2024 ब्रिक्स शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी चर्चेत आहे. त्याच वेळी, याला रशियाची तिसरी राजधानी देखील म्हटले जाते. 2018 मध्ये येथे फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतही येथे आपला दूतावास उघडणार आहे.
कझान हे युक्रेनपासून 1400 किमी दूर आहे
रशियातील कझान शहर युक्रेनमधील कीवपासून सुमारे 1400 किलोमीटर अंतरावर आहे. 24 फेब्रुवारी 2022 पासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली आणि तेथील अनेक शहरे उद्ध्वस्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या