एक्स्प्लोर
बहुप्रतिक्षीत 'अण्णा : किसन बाबूराव हजारे' आजपासून देशभरात प्रदर्शित

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कारकीर्दीवर बनवलेला सिनेमा आजपासून देशभरात प्रदर्शित झाला आहे. 'अण्णा : किसन बाबूराव हजारे' असं या सिनेमाचं नाव आहे. 130 मिनिटांच्या या सिनेमात किसन बाबुराव हजारे ते अण्णा हजारे हा प्रवास दाखवण्यात आला आहे.
अण्णांचा जीवनपट उलगडणाऱ्या या सिनेमाचं शूटिंग राळेगणसिद्धीसह मुंबई, नवी दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये झालं आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अण्णांनी जवळपास 10 महत्त्वाच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. मुंबईतील काही चित्रपटगृहामध्येही अण्णा हजेरी लावणार आहेत.
अण्णांच्या जीवनावर आधारित या सिनेमात शशांक उदापूरकर अण्णांची भूमिका वठवणार आहे. राईज पिक्चर्सची निर्मिती असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन शशांक उदापूरकरनेच केलं आहे. अभिनेत्री तनिषा मुखर्जीने एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. या सिनेमात 3 गाणीही असतील, ज्यांचं संगीत रविंद्र जैन यांनी दिलं आहे. लवकरच हा सिनेमा इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement



















