Video : ओरीचा भलताच जोर; थेट 'अॅनिमल'च्या 'भाभी-2' ला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली
Tripti Dimri And Orry: तृप्तीनं काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटला हजेरी लावली. या इव्हेंटमधील तृप्तीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Tripti Dimri And Orry: संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित अॅनिमल (Animal) या चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Tripti Dimri) विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामधील तृप्ती आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीन्सनं अनेकांचे लक्ष वेधले. सध्या अॅनिमलचा सक्सेस एन्जॉय करत असणाऱ्या तृप्तीनं काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटला हजेरी लावली. या इव्हेंटमधील तृप्तीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच या इव्हेंटमधील एका व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले. ज्यामध्ये तृप्ती ही ओरीसोबत फोटोसाठी पोज देताना दिसली.
तृप्ती आणि ओरीची भेट
AJIO Luxe Weekend या इव्हेंटला तृप्ती आणि ओरीनं हजेरी लावली. यावेळी ओरी हा ब्लू डेनिम पँट आणि ऑरेंज टीशर्ट अशा लूकमध्ये दिसला. तर तृप्ती ही पिवळ्या रंगाचा ड्रेस, सिल्वर कलरचे फुटवेअर आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसली. ओरी आणि तृप्तीनं फोटोसाठी एकत्र पोज दिल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिसले की, ओरी हा तृप्तीला मिठी मारतो त्यानंतर तो तिच्या गालावर किस करतो.
ओरी आणि तृप्तीच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. एका नेटकऱ्यानं व्हिडीओला कमेंट केली, बॉलिवूडमधील अनेक जण ओरीचे फॅन्स आहेत.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
'अॅनिमल'मुळे तृप्तीला मिळाली लोकप्रियता
तृप्ती डिमरीला अॅनिमल या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. अॅनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटामधील तृप्ती आणि रणबीरच्या इंटिमेट सीन्सची चर्चा सोशल मीडियावर झाली. एका मुलाखतीमध्ये तृप्तीनं अॅनिमल चित्रपटातील इंटिमेट सीन्सबद्दल सांगितलं. ती म्हणाली, " सेटवर फक्त चार-पाच लोक होते. दर पाच मिनिटांनी ते सर्व लोक मला विचारत होते, 'तू ठीक आहेस ना?' तुला काही हवे आहे का? तुला कम्फर्टेबल वाटत आहे का?' अॅनिमल या चित्रपटाच्या आधी तृप्तीनं 'बुलबुल' आणि 'कला' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
जाणून घ्या ओरीबद्दल (Know About Orry)
ओरीचं खरं नाव ओरहान अवत्रामणी (Orhan Awatramani) असं आहे. ओरी हा विविध बॉलिवूड पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. या फोटोमध्ये ओरी आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार दिसतात. ओरी नेमकं काय काम करतो? त्याची लाईफस्टाईल कशी आहे? या सर्व गोष्टींबाबत जाणून घेण्यास नेटकरी उत्सुक असतात.
संबंधित बातम्या:
Tripti Dimri: 'अॅनिमल'मधील 'तो' इंटिमेट सीन पाहून तृप्तीचे आई-वडील म्हणाले तरी काय?