Animal Leak : रणबीरला मोठा फटका! 'अॅनिमल' रिलीज होताच ऑनलाईन लीक; निर्मात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
Animal Leak Online in HD : रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' हा सिनेमा रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Ranbir Kapoor Animal Leak Online in HD : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा सिनेमा अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण रिलीज होताच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. त्यामुळे अभिनेत्याला मोठा फटका बसला आहे. तसेच निर्मात्यांचेदेखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांच्या 'अॅनिमल' (Animal) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रणबीरचा 'अॅनिमल' सुपरहिट होणार असल्याचं म्हटलं जात होतं. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही या सिनेमाने धमाकेदार कामगिरी केली. पण आता या सिनेमाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. रणबीरचा 'अॅनिमल' ऑनलाईन लीक झाला आहे.
View this post on Instagram
रणबीरचा 'अॅनिमल' ऑनलाईन लीक (Animal Online Leak)
सिनेमागृहात सिनेमा प्रदर्शित झाला की तो ऑनलाईन लीक होण्याचं चित्र काही नवं नाही. 'जवान' (Jawan), 'पठाण' (Pathaan) आणि 'टायगर 3'नंतर (Tiger 3) रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. अनेक साईट्सवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.
'या' साईट्सवर 'अॅनिमल' लीक
मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर-रश्मिकाचा 'अॅनिमल' हा सिनेमा फिल्मीवैप (Filmywap), तामिळ रॉकर्स (Tamil Rockers) आणि फिल्मीजिला (Filmyzilla) या साईट्सवर लीक झाला आहे. या सर्व साईट्सवर हा सिनेमा HD क्वालिटीमध्ये लीक झाला आहे. सिनेमा लीक झाल्याने 'अॅनिमल'ची टीम हैरान झाली आहे. सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने सिनेमाच्या कमाईवर नक्कीच याचा परिणाम होणार आहे.
'अॅनिमल' पहिल्याच दिवशी करणार कोट्यवधींची कमाई
'अॅनिमल' हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने रणबीरचे चाहते नाराज झाले आहेत. पण तरीही हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करणार आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'अॅनिमल' 40 कोटींपेक्षा अधिक कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या