(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Animal Box Office Collection : रणबीरच्या 'अॅनिमल'ने रचला इतिहास! ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा; 'पठाण', 'जवान','दंगल'चा मोडला रेकॉर्ड
Animal Movie : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत इतिहास रचला आहे.
Animal Box Office Collection Day 10 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या दहा दिवसांतच या सिनेमाने इतिहास रचला आहे. सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. 'पठाण','जवान' आणि 'दंगल' या सिनेमांचाही रेकॉर्ड 'अॅनिमल'ने ब्रेक केला आहे.
तिकीटबारीवर रणबीरचा बोलबाला
'अॅनिमल' हा सिनेमा रिलीजआधीपासून चर्चेत होता. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केली होती. रिलीजच्या दहा दिवसांनंतरही सर्वत्र या सिनेमाचीच चर्चा आहे. अनेक प्रेक्षक पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. त्यामुळे तिकीटबारीवर रणबीरचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Animal Box Office Collection)
'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओपनिंग डेला अॅनिमलने 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी, पाचव्या दिवशी 37.47 कोटी, सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24.23 कोटी, आठव्या दिवशी 22.95 कोटी, नवव्या दिवशी 34.74 कोटी, दहाव्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने 432.27 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 660 कोटींचा गल्ला जमवला आहे.
View this post on Instagram
पहिला दिवस : 63.8 कोटी
दुसरा दिवस : 66.27 कोटी
तिसरा दिवस : 71.46 कोटी
चौथा दिवस : 43.96 कोटी
पाचवा दिवस : 30.39 कोटी
सहावा दिवस : 24.23 कोटी
सातवा दिवस : 24.23 कोटी
आठवा दिवस : 22.95 कोटी
नववा दिवस : 34.74 कोटी
दहावा दिवस : 37 कोटी
एकूण कमाई : 432.27 कोटी
'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी सांभाळली आहे. या सिनेमात रणबीर कपूरसह (Ranbir Kapoor) रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), बॉबी देओल (Bobby Deol), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि तृप्ति डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'अॅनिमल'ने रिलीजच्या दहाव्या दिवशी भारतात 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. संदीप रेड्डी वांगाचे अॅनिमलआधी अर्जुन रेड्डी, कबीर सिंह हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 100 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा आता किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या