अमूलकडून दीपिकाला कौतुकाची थाप; शेअर केली खास पोस्ट
दीपिकासाठी दीपिका पादूकोण (Deepika Padukone) अमूल कंपनीनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Deepika Padukone: बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केल्यानंतर आता दीपिका पादूकोण (Deepika Padukone) जगभरातील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. तिनं काही दिवसांपूर्वी कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच ती कान्स फेस्टिव्हलची ज्युरी मेंबर देखील होती. आता ती लवकरच ऑस्कर-2023 पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर म्हणून उपस्थित राहणार आहे. आता दीपिकासाठी अमूल कंपनीनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रसिद्ध डेअर ब्रँड अमूल कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अमूलच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. वेगवेगळ्या चित्रपटांबद्दलच्या तसेच घटनांबद्दलच्या खास पोस्ट अमूल कंपनी त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर करते. आता दीपिका ही ऑस्कर-2023 पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर म्हणून उपस्थित राहणार आहे, त्यामुळे अमूलनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन महिला हातात बटर लावलेला ब्रेड घेऊन उभ्या राहिलेल्या दिसत आहेत.
View this post on Instagram
ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसह ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
ऑस्कर-2023 पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर्सच्या यादीत दीपिकाचं नाव आहे. याबाबत दीपिकानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सर्व प्रेजेंटर्सचं नाव दिसत आहे.
View this post on Instagram
दीपिकाचे चित्रपट
दीपिकाचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. दीपिकाचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात 'डिंपल गर्ल' अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. तसेच 'प्रोजेक्ट के' या सिनेमात दीपिका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: