एक्स्प्लोर
अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या 'दिवार'वर महापालिकेचा हातोडा?
संघर्षाच्या काळात अभिनेते आणि दिग्दर्शक मेहमूद यांच्या घरी अमिताभ काही काळ राहिले होते. आज मुंबईत त्यांचे स्वतःच्या मालकीचे पाच आलिशान बंगले आहेत. मात्र महापालिकेच्या रुंदीकरणाच्या नोटीसवर अमिताभ अजूनही 'निशब्द' आहेत.
मुंबई : अभिनयाचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या जुहूतील 'प्रतीक्षा' बंगल्यातून घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन करतात. वाढदिवसाला तर इथे तोबा गर्दी जमते. अँग्री यंग मॅनची एक झलक पाहण्यासाठी इथे तास् न तास् लोक उभे राहतात. मात्र ज्या ठिकाणाहून बच्चन अभिवादन करताना दिसतात, त्याच प्रतीक्षा बंगल्याचा लॉन धोक्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांनी कुठलंही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही. मात्र अंधेरीतल्या या जुहू भागातल्या संत ज्ञानेश्वर मार्गाचं रुंदीकरण होणार आहे. मात्र, हे काम प्रतीक्षा शेजारील बंगल्याच्या मालकांनी रुंदीकरणासाठी दिलेल्या नकारामुळे गेल्या सहा महिन्यापासून रखडलं आहे. शिवाय या कामामुळे प्रतीक्षा आणि शेजारील बंगल्याची कम्पाऊंड वॉल अंदाजे 15 फुटांपर्यंत पाडावी लागणार आहे. महापालिकेने याबाबत अमिताभ यांना पूर्वसूचनाही दिलेली आहे. त्यावर अद्याप अमिताभ यांचं उत्तर आलेलं नाही.
महानायकाचा 'आशियाना'
मुंबईत बिग बींचे पाच बंगले आहेत
प्रतीक्षा, जलसा, जनक, आशियानासह एक बंगला
ज्यांची किंमत अंदाजे 300 कोटींच्या घरात आहे
जलसा बंगल्यात अमिताभ यांचं कुटुंब राहतं
जनक बंगल्यात अमिताभ यांचं कार्यालय आहे
नात आराध्यासाठी आशियाना बंगल्याची खरेदी केली आहे
संघर्षाच्या काळात अभिनेते आणि दिग्दर्शक मेहमूद यांच्या घरी अमिताभ काही काळ राहिले होते. आज मुंबईत त्यांचे स्वतःच्या मालकीचे पाच आलिशान बंगले आहेत. मात्र महापालिकेच्या रुंदीकरणाच्या नोटीसवर अमिताभ अजूनही 'निशब्द' आहेत. सत्तरच्या दशकातल्या अमिताभ यांच्या दिवार सिनेमाने सगळे रेकॉर्ड तोडले होते. मात्र आता त्यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या 'दिवार'चा 'आखिरी रास्ता' काय निघणार ही एक 'पहेलीच' आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
Advertisement