एक्स्प्लोर

म्हणून मी घाई-गडबडीत विवाहबंधनात, लग्नाच्या 46 व्या वाढदिवशी बिग बींनी सांगितला किस्सा

आम्हा दोघांचं लग्न झालं, तरच आम्ही एकत्र जाऊ शकतो, अशी अट वडिलांनी घातल्यामुळे मी पेचात पडलो, असं बिग बींनी सांगितलं.

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत सोमवारी लग्नाचा 46 वा वाढदिवस साजरा केला. बिग बींची ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. आपण कशापद्धतीने घाई-गडबडीत विवाहबंधनात अडकलो, त्याचा किस्सा अमिताभ यांनी चाहत्यांसोबत शेअर केला. 3 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांनी लग्न केलं. 'ही 1973 ची गोष्ट आहे. मी, जया आणि आमच्या काही मित्रांना लंडनमध्ये सुट्ट्यांसाठी जायचं होतं. त्यावेळी मी आणि जया डेट करत होतो. मात्र माझे वडील, अर्थात कविवर्य हरिवंशराय बच्चन म्हणाले होते, की आम्हा दोघांचं लग्न झालं, तरच आम्ही एकत्र जाऊ शकतो. त्यामुळे मी पेचात पडलो' असं बिग बींनी सांगितलं. 'जर जंजीर सिनेमा हिट झाला, तर तुम्हाला लंडनमध्ये फिरायला नेईन, असं आश्वासन मी माझ्या मित्रांना दिलं होतं. आम्ही कोण कोण जाणार, याबाबत वडिलांनी विचारणा केली, तेव्हा 'जया' हे नावही समोर आलं. तुम्हा दोघांना जायचं असेल, तर लग्न करा आणि मगच जा' असं माझ्या वडिलांनी बजावल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले. आम्ही दुसऱ्याच दिवशी लग्न केलं आणि रात्री तडक लंडनचं विमान पकडलं, असंही त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांनी शोले, सिलसिला, अभिमान यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. सेकंड इनिंगमध्ये ते करण जोहरच्या कभी खुशी कभी गम चित्रपटातही एकत्र झळकले होते.

महत्त्वाच्या बातम्या

'2 वर्षांपासून आंघोळ नाही, ना अंथरुणातूनही उठले'; अभिनेता शरद कपूरची विदारक अवस्था होती, हेमा चौधरींनी सगळंच सांगितलं
'2 वर्षांपासून आंघोळ नाही, ना अंथरुणातूनही उठले'; अभिनेता शरद कपूरची विदारक अवस्था होती, हेमा चौधरींनी सगळंच सांगितलं
Madhuri Dixit Lookalike Actress: हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
Jackie Shroff on Mahesh Manjrekar: 'आता तो मला सिनेमात घेतच नाही'; महेश मांजरेकरांबद्दल जॅकी श्रॉफ काय म्हणाले? मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त
'आता तो मला सिनेमात घेतच नाही'; महेश मांजरेकरांबद्दल जॅकी श्रॉफ काय म्हणाले? मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त
Supriya Pilgaonkar New Movie: सुप्रिया पिळगावकरांची मराठी चित्रपटात कमबॅक; आगामी सिनेमाचं नाव काय? कोणता कलाकार मुख्य भूमिका साकारणार?
सुप्रिया पिळगावकरांची मराठी चित्रपटात कमबॅक; आगामी सिनेमाचं नाव काय? कोणता कलाकार मुख्य भूमिका साकारणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Embed widget