एक्स्प्लोर

Ameya Khopkar: "मल्टिप्लेक्सचालक नालायकपणा करतायत"; गोदावरी, सनी चित्रपटांचे शो कमी केल्यानं अमेय खोपकर संतापले

मल्टिप्लेक्सचालक नालायकपणा करतायत, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आलीय, असा इशार अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे.

Ameya Khopkar: गोदावरी (Godavari) आणि सनी (Sunny) या मराठी चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांची गर्दी खेचत आहेत. पण या चित्रपटांचे शोज सोमवारी (21 नोव्हेंबर) कमी करण्यात आले आहेत. हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे, अशा शब्दात मनसेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी संताप व्यक्त केला.  मल्टिप्लेक्सचालक नालायकपणा करतायत, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आलीय, असा इशार अमेय खोपकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे. 

अमेय खोपकर यांचे ट्वीट

लोकप्रिय आणि चांगली कलाकृतींना बळ देणं हे गरजेचं आहे. सनी चित्रपटाला किती गर्जी होतेय हे सोशल मीडियामधील व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय. असं असूनही मल्टीप्लेक्सचालक नालायकपणा करतायत, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आली आहे.' असं महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. 

अमेय खोपकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं, 'मल्टिप्लेक्सच्या काही प्रमुखांना मी फोन केला आहे. मी त्यांना सांगितलं की, ही नाटकं चालणार नाही. गोदावरी आणि सनी हे चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटांचे शो हाऊसफुल आहेत. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचे शो लावायचे नाहीत. तर काय साऊथचे सिनेमांचे शो लावायचे? मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की, जसे तुम्ही हिंदी सिनेमे किंवा इतर सिनेमे थिएटरमध्ये जाऊन तसेच मराठी सिनेमा  टिव्हीवर प्रदर्शित होण्याची वाट न बघता. तो सिनेमा थिएटरमध्ये बघा. महाराष्ट्रीत गोदावरी आणि सनी या चित्रपटांना शो मिळालेच पाहिजेत.'

गोदावरी हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. सध्या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी बरोबरच अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने, अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तर सनी हा चित्रपट 18 नोव्हेंबरला रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेता ललीत प्रभाकरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ameya Khopkar: 'कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर...'; अमेय खोपकर यांचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sangali Cafe Todfod Special Report : कॅफे संस्कृती, वाढतेय विकृती! कॅफेमधले काळे धंदे कधी थांबणार?ABP Majha Headlines : 12 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सIndia Alliance Pc : भाजपचं केवळ तोडा-फोडा आणि राज्य करा, उद्धव ठाकरेंची टीका ABP MajhaUddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Uddhav Thackeray : राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल...मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, खरगे अन् शरद पवार म्हणाले...
राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल, उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींच्या टीकेवर उत्तर
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
Embed widget