(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने ब्रम्हा सनसिटी जवळील, एफ प्लाझा बिल्डींगचा गाळा क्र. जी 55, वडगाव शेरी मध्ये छापा घालून परदेशी बनावटीच्या मद्यासह 11 लाख 54 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सगळीकडील अवैध धंद्यांवर (Pune Crime news) पोलिसांची करडी नजर आहे. राज्यात अनेक ठिकाणी गाड्या आणि मोठी वाहतूक करणाऱ्या टेम्पोची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी धडक कारवाई करण्यात येत आहे आणि मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने ब्रम्हा सनसिटी जवळील, एफ प्लाझा बिल्डींगचा गाळा क्र. जी 55, वडगाव शेरी मध्ये छापा घालून परदेशी बनावटीच्या मद्यासह 11 लाख 54 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उच्च प्रतीच्या परदेशी बनावटीच्या आयात विदेशी मद्याच्या वेगवेगळया ब्रॅण्डच्या व क्षमतेच्या 36 सीलबंद बाटल्या तसेच एक होंडा कंपनीची अमेझ मॉडेलची चारचाकी कार तसेच एक होंडा कंपनीची ॲक्टिव्हा दुचाकी वाहन व मोबाईल फोन असा एकूण 11 लाख 54 हजार 525 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये एका इसमाला अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील इतर इसमांचा शोध सुरु आहे. या कारवाईमध्ये विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे सह निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ए विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर यांच्या पथकांचा सहभाग होता. अवैध दारु निर्मिती, वाहतूक व विक्री व्यवसायाशी संबंधीत माहिती निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदेशीर तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जाणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता अतिसंवेदनशील आणि संवेदनशील भागाची यादी तयार करावी. या भागातील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटी देऊन आवश्यक त्या सर्व सुरक्षितेतच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अशा भागात तातडीने शस्त्रास्त्रे जमा करण्याची कार्यवाही करावी. गुन्हेगारीवृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.
इतर महत्वाची बातमी-
Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता