Alia Bhatt : आलिया भट्ट मॅटरनिटी लीव्हवर; बाळाच्या जन्मानंतर एक वर्ष घेणार ब्रेक
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Alia Bhatt Pregnancy Update : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. आलिया आणि रणबीर 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. तर जूनमध्ये आलियाने चाहत्यांना गोड बातमी दिली. गेल्या काही दिवसांपासून आलिया आगामी सिनेमांच्या शूटिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच आलियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बाळाच्या जन्मानंतर आलिया एक मोठा ब्रेक घेणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आलिया तिच्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच तिने मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाने बाळाच्या जन्मानंतर वर्षभर मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आलियाने तिच्या आगामी 'हार्ट ऑफ स्टोन' आणि करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमांचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आलियासारखं रणबीरदेखील सिनेमांमधून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. नुकताच आलियाचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मंडळींसोबत हा कार्यक्रम पार पडला आहे. आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमांचे चांगलीच कमाई केली. आता आलिया-रणबीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्राच्या 'जी ले जरा' या सिनेमातदेखील आलिया झळकणार आहे.
संबंधित बातम्या
Alia Bhatt Baby Shower: आलिया भट्टच्या बेबी शॉवरची झलक, दिसली देसी अवतारात!
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















