Ala Vaikunthapurramuloo Hindi Teaser : अल्लू अर्जुनच्या 'अला वैंकुटापुर्रामुलू' सिनेमाचा हिंदी टीझर रिलीज
Ala Vaikunthapurramuloo : अल्लू अर्जुनचा 'अला वैंकुटापुर्रामुलू' हा सिनेमा आता हिंदीत प्रदर्शित होत आहे.
Allu Arjun Ala Vaikunthapurramuloo Hindi Teaser : अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या पुष्पा (Pushpa) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता अल्लू अर्जुनचा 'अला वैंकुटापुर्रामुलू' (Ala Vaikunthapurramuloo) हा सुपरहिट सिनेमा हिंदीत प्रदर्शित होणार आहे. 'अला वैंकुटापुर्रामुलू'चा हिंदी टीझरही रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
अल्लू अर्जुनच्या या सिनेमात तब्बू आणि पूजा हेगडेदेखील आहे. हा सिनेमा 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. तसेच लवकरच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
View this post on Instagram
तेलगूमध्ये सुपरहिट ठरला होता 'अला वैंकुटापुर्रामुलू'
2020 मध्ये प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा तेलुगु चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट 12 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली होती. अल्लू अर्जुन आणि त्याच्या चित्रपटांची लोकप्रियता पाहता 'अला वैंकुटापुर्रामुलू' हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
Savaniee Ravindrra | माय-लेकीचा हळवा बंध, गायिका 'सावनी रविंद्र'ने लेक शार्वीसाठी गायली 'लडिवाळा’ अंगाई!
Zombivli Trailer : अमेय-ललितच्या 'झोंबिवली' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 26 जानेवारी रोजी चित्रपट होणार प्रदर्शित
Nitish Bharadwaj Divorce : महाभारतातील कृष्ण Nitish Bharadwaj चा झाला घटस्फोट, म्हणाला घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha