Zombivli Trailer : अमेय-ललितच्या 'झोंबिवली' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 26 जानेवारी रोजी चित्रपट होणार प्रदर्शित
Zombivli Trailer : बहुप्रतिक्षीत 'झोंबिवली' सिनेमा येत्या 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
Zombivli Trailer : बहुप्रतिक्षीत 'झोंबिवली' (Zombivli) या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर येत्या 26 जानेवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात सिनेमात अमेय वाघ, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
'झोंबिवली' सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. "आम्ही पाच, पडणार झोंब्यांवर भारी! 26 जानेवारीला येतोय करून सगळी तयारी", अशी पोस्ट करत अमेय वाघने सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
काहीसा हॉरर आणि तितकाच धमाल उडवून देणारा 'झोंबिवली' सिनेमाचा ट्रेलर आहे. ट्रेलमधील काही सीन भीतीदायक वाटतात तर काही संवाद मात्र हसायला भाग पाडतात. हा चित्रपट 4 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून आता हा चित्रपट फेब्रुवारीच्या आधीच म्हणजे २६ जानेवारीला रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Nitish Bharadwaj Divorce : महाभारतातील कृष्ण Nitish Bharadwaj चा झाला घटस्फोट, म्हणाला घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल
Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा मुहूर्त ठरला, पोस्टर शेअर करत जाहीर केली रिलीज डेट
Moon Knight Trailer : मार्वेलचा 'बॅटमॅन'; मूननाईटचा क्रेझी ट्रेलर रिलीज!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha