एक्स्प्लोर
अक्षय कुमारचा 2017 च्या स्वातंत्र्यदिनाला नवा सिनेमा, पोस्टरही रिलीज
मुंबईः दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या 'स्पेशल 26' आणि 'बेबी' या सिनेमांनतर अक्षय कुमार पुढील वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षय कुमारने स्वतः याबाबत घोषणा केली असून सिनेमाचं पहिलं पोस्टरही रिलीज झालं आहे.
दिग्दर्शक नीरज पांडे यांच्यासोबत अक्षय कुमारने 'स्पेशल 26' आणि 'बेबी' हे दोन हीट सिनेमे केले होते. त्यानंतर पुढच्या वर्षीचा स्वातंत्र्यदिनाचा वीकेंड खास बनवण्यासाठी अक्षय कुमार भेटीला येत आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/765128641659318272
दरम्यान या सिनेमात अक्षय कुमार पुन्हा एकदा 'स्पेशल 26' आणि 'बेबी' या सिनेमांप्रमाणेच भूमिका साकारणार आहे का, याबाबत सस्पेंस ठेवण्यात आला आहे. अक्षय कुमारचा 'रुस्तम' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. त्यातच अक्षय कुमारने नव्या सिनेमाची पोस्टरसह घोषणा करुन चाहत्यांना सरप्राईजच दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement