एक्स्प्लोर
अयोग्य व्हिसामुळे हिथ्रो विमानतळावर अक्षयकुमारची अडवणूक?
लंडन : योग्य व्हिसा नसल्यामुळे बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षयकुमारची लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अधिकाऱ्यांनी अडवणूक केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येत होत्या. मात्र यात काहीच तथ्य नसल्याचा दावा अक्षयच्या प्रवक्त्यांनी केला आहे. अक्षयला काही मिनिटांतच एअरपोर्टवरुन बाहेर जाऊ दिल्याचं म्हटलं आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार कॅनडाचं नागरिकत्व असलेल्या अक्षयकुमारला विमानतळ अधिकाऱ्यांकडून पासपोर्टची छाननी होईपर्यंत ताटकळत रहावं लागलं. कॅनडाचा नागरिकत्व असलेल्यांना पर्यटक म्हणून किंवा बिझनेससाठी व्हिसाशिवाय 90 दिवस यूकेमध्ये राहण्याची परवानगी आहे. मात्र ही सर्व छाननी होईपर्यंत अक्षयला वाट पाहत बसावं लागलं होतं.
'अक्षयला ताब्यात घेतल्याचं वृत्त चुकीचं आहे. अक्षयला इमिग्रेशन प्रक्रियेसाठी विलंब झाला, ज्यासाठी अधिकाऱ्यांनी माफीही मागितली.' अशी माहिती अक्षयच्या जवळच्या सुत्रांनी पीटीआयला दिली. अक्षयकुमार सध्या रुस्तम चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. व्हिसा नसल्यामुळे अक्षयला दीड तास थांबवण्यात आल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं.
सुटका करण्यासाठी अक्षयने आपल्या स्टारडमचा वापर केल्याचंही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मात्र हे दावेही अक्षयकुमारच्या टीमने फेटाळून लावले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement