एक्स्प्लोर
लुंगी, सोनसाखळ्या, कपाळावर भस्म, अक्षयच्या 'बच्चन पांडे'चा फर्स्ट लूक
सिनेमाच्या पोस्टरवर काळ्या रंगाची लुंगी, गळ्यात सोन्याची चैन आणि कपाळावर भस्म लावलेल्या लूकमध्ये अक्षय कुमार दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या नव्या सिनेमाची दणक्यात घोषणा केली आहे. चित्रपटाचं नाव आहे 'बच्चन पांडे'. अक्षयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिनेमाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. यामध्ये त्याचा लूक अगदी हटके आहे. काही मिनिटांतच त्याच्या या लूकची जोरदार चर्चा सुरु झाली.
सिनेमाच्या पोस्टरवर काळ्या रंगाची लुंगी, गळ्यात सोन्याची चैन आणि कपाळावर भस्म लावलेल्या लूकमध्ये अक्षय कुमार दिसत आहे.
'बच्चन पांडे' या सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाचे निर्माता आहे. 2020 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अक्षय कुमारकडे सध्या चार चित्रपट आहेत. मिशन मंगलनंतर तो हाऊसफुल 4, गुड न्यूज, सूर्यवंशी आणि लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यापैकी सूर्यवंशी आणि लक्ष्मी बॉम्ब 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.Coming on Christmas 2020! In & As #BachchanPandey 😎 In #SajidNadiadwala’s Next, directed by @farhad_samji @NGEMovies @WardaNadiadwala pic.twitter.com/ayMkzwPEsJ
— Akshay Kumar (@akshaykumar) July 26, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement