एक्स्प्लोर
अक्षय कुमारची इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या दोन कोटींवर
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या सोशल मीडियावरील चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इन्स्टाग्रामवर अक्षय कुमारच्या फॉलोअर्सची संख्या दोन कोटींवर पोहोचली आहे.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या सोशल मीडियावरील चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इन्स्टाग्रामवर अक्षय कुमारच्या फॉलोअर्सची संख्या दोन कोटींवर पोहोचली आहे. याबाबत अक्षयने आनंद व्यक्त करत आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
दोन कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केल्यानंतर अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तो आपला आनंद साजरा करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अक्षयने आपल्या भावना व्यक्त करत लिहिलंय की, "मी आश्चर्यचकीत आहे, मी कशाचा आनंद साजरा करतोय. आपलं कुटुंब दोन कोटींचं झालं, यामुळे मी अत्यंत खुश आहे. माझ्या सोबत राहिल्याबद्दल सर्वांचे आभार."
अक्षय त्याच्या आगामी 'गोल्ड' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात अमित साध प्रमुख भूमिकेत आहे. तर टीव्ही कलाकार मौनी रॉय गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. भारताला मिळालेल्या पहिल्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलची गोष्ट या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. भारताच्या हॉकी टीमने 1948 मध्ये ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शिद होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement