Raksha Bandhan Box Office Collection : अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला! पाहा कलेक्शनचा आकडा
Raksha Bandhan : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
Raksha Bandhan : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या वर्षात रिलीज झालेले दोन चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर अक्षयच्या नव्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची निराशाच केली आहे. अक्षयच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता, हा चित्रपट सपाटून आपटल्याचे कळते आहे. अक्षयचा हा नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेला नाही.
'सम्राट पृथ्वीराज'नंतर गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला 'रक्षा बंधन'ही प्रेक्षकांना फारसा रुचलेला नाही. या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. वीकेंडलाही चित्रपटाने काही विशेष कमाई केलेली नाही. अक्षय कुमारच्या चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन नुकतेच समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.
तिसऱ्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘रक्षा बंधन’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी जवळपास 6.30-7 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 21 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.20 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 6.40 कोटींचा गल्ला जमवला होता. तीन दिवसांत या चित्रपटाची कमाई फारच निराशाजनक झाली आहे. अक्षय कुमारचा सलग तिसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे.
सुट्ट्यांचा फायदाही नाहीच!
अक्षय कुमारचा चित्रपट रक्षाबंधनचं निमित्त साधून प्रदर्शित करण्यात आला. मात्र, याचा तरीही या चित्रपटाच्या कलेक्शनवर याचा काहीच परिणाम झालेला नाही. सुट्टीच्या दिवसांत देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. अर्थात या चित्रपटाला सुट्ट्यांचा देखील काहीच फायदा मिळालेला नाही. आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट देखील रक्षाबंधनाच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर झाली. मात्र, या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कोणतेही महत्त्वाचे बदल दिसत नाहीत. दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरत आहेत.
अक्षयसोबतच अभिनेत्री भूमि पेडणेकर, सादिया खतीब, स्मृती श्रीकांत, दीपिका खन्ना आणि सहजमीन कौर हे कलाकार ‘रक्षा बंधन’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केलं आहे. अक्षयच्या या चित्रपटात भरपूर फॅमिली ड्रामा आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय आणि भूमीची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. याआधी दोघे 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात एकत्र दिसले होते.
संबंधित बातम्या