Raksha Bandhan Trailer : खिलाडी कुमारच्या 'रक्षा बंधन'चा ट्रेलर आऊट; अक्षय आणि भूमीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
Raksha Bandhan : अक्षय कुमारचा आगामी 'रक्षा बंधन' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Raksha Bandhan Trailer : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) सिनेमामुळे चर्चेत आला आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. हा सिनेमा बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारा आहे.
'रक्षा बंधन' हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे. हा सिनेमा चार बहिणी आणि एक भाऊ यांच्या नात्यावर भाष्य करणारा आहे. नुकत्याच आऊट झालेल्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. अक्षयच्या या सिनेमात कौटुंबिक नाट्य दाखवण्यात आले आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आमिर खान आणि अक्षय कुमार येणार आमने-सामने
अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान 11 ऑगस्टलाच आमिर खान आणि करीना कपूरचा बहुचर्चित 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमादेखील प्रदर्शित होणार आहे. आधी हा सिनेमा 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण काही कारणांमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 11 ऑगस्टला आमिर खान आणि अक्षय कुमार आमने-सामने येणार आहेत.
'रक्षा बंधन' या सिनेमात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय आणि भूमीची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. याआधी दोघे 'टॉयलेट एक प्रेम कथा' या सिनेमात दिसून आले होते. त्यामुळे प्रेक्षक आता दोघांना 'रक्षा बंधन' सिनेमात पाहण्यास उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या