Shreyas Iyer Injury : मागे पळत सूर मारुन झेल पकडला, पण श्रेयस अय्यर जोरात आपटला, रडत रडत सोडलं मैदान, नेमकं काय घडलं? पाहा Video
Shreyas Iyer Injury : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना सिडनीच्या मैदानावर रंगला असताना एक अशी घटना घडली, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Australia vs India, 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना सिडनीच्या मैदानावर रंगला असताना एक अशी घटना घडली, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer Injury Video) असा एक झेल घेतला की, तो पाहून सर्वजण थक्क झाले. मात्र, या अप्रतिम झेलनंतर अय्यरला दुखापत झाली आणि त्याला रडत रडत मैदान सोडावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या डावात अॅलेक्स केरीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू हवेत उंच गेला. श्रेयस अय्यरने मागे वळून एक जबरदस्त झेल पकडला. हा झेल घेताना त्याला दुखापत झाली.
Shreyas Iyer with a brilliant running catch as Harshit Rana gets rid of Alex Carey.
— BCCI (@BCCI) October 25, 2025
Live - https://t.co/nnAXESYYUk #TeamIndia #AUSvIND #3rdODI pic.twitter.com/YWYOkMp6ni
श्रेयस अय्यरसोबत नेमकं काय घडलं? (Shreyas Iyer Injury)
ऑस्ट्रेलियाच्या डावात हर्षित राणाच्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत उंच गेला. त्या वेळी बॅकवर्ड पॉइंटच्या मागून धावत आलेल्या श्रेयस अय्यरने मागे झेप घेत एक अफलातून झेल पकडला. हा झेल घेताना त्याच्या पोटाला दुखापत झाली आणि त्याला तीव्र वेदना जाणवू लागल्या. मागे धावताना असा कॅच घेणं अत्यंत अवघड होतं, पण अय्यरने अप्रतिम संतुलन राखत तो झेल पूर्ण केला.
𝐒𝐡𝐫𝐞𝐲𝐚𝐬 𝐈𝐲𝐞𝐫 on Fiyer. ❤️🔥
— Star Sports Kannada (@StarSportsKan) October 25, 2025
ಕಷ್ಟದ ಕ್ಯಾಚ್ ಹಿಡಿದು ಉತ್ತಮ Breakthrough ತಂದುಕೊಟ್ಟ ಉಪನಾಯಕ.👏
📺 ವೀಕ್ಷಿಸಿ | #AUSvIND | 3rd ODI | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.#TeamIndia pic.twitter.com/k9wtBIpvGd
या झेलमुळे ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरी 37 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला. झेल घेतल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानावरच वेदनेने तडफडताना दिसला. मैदानावरील फिजिओ लगेच धावून आले आणि अय्यरची तपासणी केली. मात्र, वेदना वाढल्याने त्याला मैदानाबाहेर न्यावे लागले. पण अय्यरने ज्या चपळाईने झेल घेतला, तो खरोखरच एक ‘गेम-चेंजर’ क्षण होता.
अय्यर मैदानातून बाहेर जात असताना तो प्रचंड वेदनेत दिसत होता आणि डोळ्यांत पाणी दिसत होते. या झेलमुळे ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. पण अय्यरची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली असून, संघ व्यवस्थापनाने अधिकृत अपडेट देण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -
















