एक्स्प्लोर

Sanjay Shirsat: मी 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता कधीतरी...; मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?

Sanjay Shirsat: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

Sanjay Shirsat: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राजकारणातून (Politics) निवृत्तीचे संकेत दिले आहेत. वयानुसार कधीतरी थांबायचं का? असा माझ्या मनात प्रश्न असल्याचं शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

मंत्री संजय शिरसाट एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, संजय शिरसाट हा अल्पसंतुष्ट माणूस आहे. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे अशा प्रकारचे मला कधीच भूक नव्हती, ना असेल. मी दहा वर्ष नगरसेवक होतो. वीस वर्षे मी आमदार आहे. ज्याचे कधी आपण स्वप्न पाहिले नाही ते सर्व स्वप्न आपण भोगलेले आहेत. शेवटी माणसाचे वय हे त्याला काही कारणाने थांबायला भाग पाडते. आपण तिथपर्यंत विचार करायचा नाही. आपण कधीतरी थांबायचं का? असा प्रश्न माझ्या मनात आला. रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचे का? मी मनाशी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे की थांबला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 

Sanjay Shirsat: माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी

संजय शिरसाट पुढे म्हणाले की, यासाठी कुणाचा राजकीय दबाव, कोणी बोलत आहे किंवा वैतागून मी काही बोलत आहे अशातला काहीच भाग नाही. मी आता 64 वर्षांचा आहे. लवकरच मी 65 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. स्वप्न पाहायला आपण काहीही पाहू शकतो.मला 2029 पर्यंतचा काळ आहे. 2029 साली मी 69 वर्षांचा होईल. त्यावेळेस काय करावे याचा विचार तर केलाच पाहिजे ना. राजकारण हा सेवेची संधी असलेला भाग जरी असला तरी आता माझ्याकडे असलेले खाते मोठे आहे. मी चांगले काम करत आहे. त्यामुळे मला आणखीन काहीतरी पाहिजे किंवा माझ्या काही अपेक्षा आहेत असे काही नाही. माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आहे, असे देखील त्यांनी म्हटले. 

Sanjay Shirsat on Rohit Pawar: रोहित पवारांच्या आरोपावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

दरम्यान, नवी मुंबईतील सिडकोच्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर सडकून टीका केली. मलिदा गँगचे मास्टरमाईंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा, असे त्यांनी म्हटले. याबाबत संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. सर्व पुरावे सिडको अधिकाऱ्यांकडे द्या. तुम्ही ज्यांच्यासोबत फिरता त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. बिवलकर यांच्या प्रश्नाला सामोरे जा. बिवलकर यांनी SIT मागणी केली. ज्यांची दलाली करता त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. आपल्यावर टीका होत असल्याने त्यांनी हे केलं आहे. सिडकोने यावर स्पष्टीकरण दिले आहे. आरोप करणारे मूर्ख लोक आहेत. बेछूट आरोप करून त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून जमीन बळकावण्याचा यांचा प्रयत्न आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

आणखी वाचा 

Sanjay Shirsat on Farmer Protest Video: घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Floods: 'ही कसली पाहणी?' केंद्रीय पथकाचा अंधारात टॉर्च लावून पाहणीचा फार्स, शेतकरी संतप्त
Mumbai Election : 'निवडणुका जिंकण्यासाठी BJP धर्माचं कार्ड वापरतंय', विरोधकांचा पलटवार
Dhule Elections: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर बॉडीबिल्डर्सना पोलिसांची नोटीस
Farmer Loss : 'सरकार दगाबाज', 31 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? Uddhav Thackeray मराठवाड्यात.
Murlidhar Mohal : 'पुण्यातील गुन्हेगारीची पाळंमूळं इथेच आहेत', Ravindra Dhangekar यांचा मोहळ यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget