एक्स्प्लोर

Adam Gilchrist: कधीकाळी टीम इंडियाला धडकी भरवणारा अॅडम गिलख्रिस्ट म्हणतो, फक्त एक सेल्फी रोहितसोबत घेतला काय अन् अवघ्या 24 तासात...

हा योगायोग भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे जुळून आला. पोस्टमध्ये गिलख्रिस्टने रोहितसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण करून दिली. 

Adam Gilchrist on Rohit Sharma: कधीकाळी टीम इंडियालाच नव्हे, तर जगभरातील गोलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) Instagram वर टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्मासोबत एक सेल्फी शेअर केला आणि त्यासोबत एक हृदयस्पर्शी कॅप्शन जोडली. त्यामध्ये गिलख्रिस्टने 2008 पासूनच्या त्यांच्या मैत्रीचा प्रवास सांगितला. हा योगायोग भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे जुळून आला. पोस्टमध्ये गिलख्रिस्टने रोहितसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण करून दिली. 

पहिल्या भेटीची आठवण (Adam Gilchrist on Rohit Sharma)  

गिलख्रिस्टने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आज या सुंदर ओव्हल मैदानावर उभं राहिल्यावर मला 2008 ची आठवण झाली. जेव्हा मी आणि रोहित शर्मा पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी आम्हा दोघांची निवड पहिल्या आयपीएल लिलावात डेक्कन चार्जर्स संघाने केली होती. तिथून आमची मैत्री सुरू झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणारा एक “जुना बैल” आणि भारताचा महान खेळाडू बनत असलेला “तरुण बैल” असं आमचं नातं होतं. रोहित तुझ्याविरुद्ध आणि तुझ्यासोबत खेळताना, नंतर समालोचक आणि चाहत्याच्या नात्याने तुला पाहताना खूप आनंद झाला, पण सगळ्यात छान म्हणजे तुला एक मित्र म्हणून ओळखणं ही खरी मजा होती.

View this post on Instagram
 
A post shared by Adam Gilchrist (@gilly381)

पोस्टमुळे एकाच दिवसात 24,000 फॉलोअर्स वाढले 

गिलख्रिस्टने रोहित शर्मासोबतच्या एका फोटो पोस्टमुळे एकाच दिवसात 24 हजार फॉलोअर्समध्ये वाढ झाली. पोस्ट केलेल्या एका साध्या स्टोरीला 70 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. फोटो पोस्टही प्रचंड व्हायरल झाली आणि तिला सुद्धा 10 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. गिलख्रिस्टने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान समालोचन करताना या संख्यांचा उल्लेख केला. यावेळी त्याने सोशल मीडियाचा प्रभाव आणि क्रिकेटच्या व्यावसायिक पैलूंमध्ये झालेले बदल याबद्दल सांगितले.

रोहित आणि गिलख्रिस्ट दोघेही इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) फ्रँचायझीपैकी एक असलेल्या डेक्कन चार्जर्सचे संघ सहकारी (teammates) होते. रोहितने गिलख्रिस्टला आठवण करून दिली की आयपीएल लिलावानंतर 2008 मध्ये त्यांची पहिली भेट याच मैदानावर (अॅडलेड) झाली होती. सामन्यापूर्वी गिलख्रिस्टने फॉक्स स्पोर्ट्सच्या प्री-गेम कव्हरेजदरम्यान रवी शास्त्री यांचीही भेट घेतली, रोहित "खूप रिलॅक्स" दिसत होता, अशी प्रतिक्रिया यावेळी दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Beed Crime News: बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
Local Bodies OBC Reservation: राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
Smriti Mandhana, Palash Muchhal Net Worth: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल, नेटवर्थच्या बाबतीत एकमेकांच्या तोडीस तोड; महिन्याभरात किती कमावतात?
स्मृती मानधना की पलाश मुच्छल, कुणाकडे सर्वाधिक बँक बॅलेन्स? दोघांचं नेटवर्थ किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Beed Crime News: बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
Local Bodies OBC Reservation: राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
Smriti Mandhana, Palash Muchhal Net Worth: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल, नेटवर्थच्या बाबतीत एकमेकांच्या तोडीस तोड; महिन्याभरात किती कमावतात?
स्मृती मानधना की पलाश मुच्छल, कुणाकडे सर्वाधिक बँक बॅलेन्स? दोघांचं नेटवर्थ किती?
Phaltan Accident: भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
केक कापला, अंडी अन् दगड फेकलंत, नंतर बर्थडे बॉयवर पेट्रोल टाकून....; कुर्ल्यात वाढदिवसात मस्करीची कुस्करी, पाच मित्रांना बेड्या
केक कापला, अंडी अन् दगड फेकलंत, नंतर बर्थडे बॉयवर पेट्रोल टाकून....; कुर्ल्यात वाढदिवसात मस्करीची कुस्करी, पाच मित्रांना बेड्या
Palash Muchhal and Mary Dcosata: पलाश मुच्छल अन् मेरी डिकॉस्टाचं अफेअर? मोबाईलवरचं  सिक्रेट चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल
पलाश मुच्छल अन् मेरी डिकॉस्टाचं अफेअर? मोबाईलवरचं सिक्रेट चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल
Nagpur Crime BJP : नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget