एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'देवा' पाहा, अक्षयकुमार 'टायगर जिंदा है'ला भिडणाऱ्या सिनेमाच्या बाजूने
अक्षयने ट्विटरवरुन चक्क मराठी भाषेत 'देवा' सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. प्रमोद फिल्म्स हे इंडस्ट्रीत आपले गॉडफादर असल्याचं म्हणतो.
मुंबई : येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 'एक था टायगर' विरुद्ध 'देवा' आणि 'गच्ची' अशी टक्कर रंगणार आहे. बऱ्याच दिवसांनी हिंदीत बिग बजेट सिनेमा येत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये उत्सुकता आहे, मात्र अभिनेता अक्षय कुमारने मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी चंग बांधला आहे.
अक्षयने ट्विटरवरुन चक्क मराठी भाषेत 'देवा' सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. प्रमोद फिल्म्स हे इंडस्ट्रीत आपले गॉडफादर असल्याचं म्हणतो.
टायगर'विरोधात 'देवा' राज ठाकरेंच्या दरबारात
'देव तारी त्याला कोण मारी.. प्रमोद फिल्म्स आणि देवा सिनेमाच्या पूर्ण टीमला माझ्या खूपखूप शुभेच्छा. पाहायला विसरु नका, देवा - एक अतरंगी.. तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र' असं अक्षय व्हिडिओमध्ये म्हणत आहे.'टायगर जिंदा है'चे शो हवे असतील तर थिएटरमधले 95 टक्के शो हे आम्हाला द्यायला हवेत, असा सज्जड दम या चित्रपटाकडून थिएटर ओनर्स, वितरक यांना भरण्यात आला आहे. यशराजसारखा मोठा बॅनर असल्यामुळे त्यांच्या हो ला हो करणं थिएटरवाल्यांच्या हातात आहे.This is a very special shoutout for @pramodfilmsnew, my Godfather in the industry...don't forget to catch their film Deva - Ek Atrangi releasing on Dec 22 at a theatre near you ???????? @devathefilm pic.twitter.com/CveKmdNnoU
— Akshay Kumar (@akshaykumar) December 19, 2017
दोनशे-चारशे नाही! 'टायगर जिंदा है'चं तिकीट अडीच हजारावर
'देवा'च्या टीमला ही गोष्ट कळल्यावर त्यांनी थेट मनसेचा रस्ता धरला. दोन दिवसांपूर्वी देवाचे निर्माते, मनसेच्या सिनेशाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यात बैठक झाली असून, सिनेमाचे शो जाहीर झाले की मग याची रणनीती ठरवण्यात येणार आहे. याबाबत खोपकर यांनी थिएटरवाल्यांना लेखी पत्रही दिलं आहे. मराठी चित्रपटाला प्राईम टाईम नाही दिला तर आपण आपल्या खास शैलीत समजावून सांगू असा इशाराही यात देण्यात आला आहे. यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटांचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement