(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive Akshay Kelkar On Rakhi Sawant : "राखी सावंत 'बिग बॉस'ची बायको"; एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय केळकर म्हणाला...
Akshay Kelkar On Rakhi Sawant : एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय केळकर म्हणाला,"राखी सावंत 'बिग बॉस'ची बायको".
Bigg Boss Marathi Winner Akshay Kelkar On Rakhi Sawant : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा (Bigg Boss Marathi 4) नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. या पर्वात अक्षय केळकरने (Akshay Kelkar) बाजी मारली. या पर्वात सर्वसामान्य माणसांपासून ते बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतपर्यंत (Rakhi Sawant) अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. राखीच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरातील सर्वचं स्पर्धकाचं चांगलंच मनोरंजन झालं होतं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत 'बिग बॉस मराठी 4'चा (Bigg Boss Marathi 4 Winner) विजेता अक्षय केळकर म्हणाला,"राखी सावंत बिग बॉसची बायको आहे".
राखी एक कमाल व्यक्ती (Akshay Kelkar On Rakhi Sawant)
अक्षय केळकर राखी सावंत विषयी म्हणाला,"राखी सावंत एक कमाल व्यक्ती आहे. प्रेक्षकांनीदेखील 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) घरात तिला पीठ फेकताना वगैरे पाहिलं आहे. तिच्यासोबत वावरणं खूप कठीण होतं. 'बिग बॉस'चा तिला 15-16 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडूसोबत खेळताना खरचं खूप मजा आली".
अक्षय पुढे म्हणाला,"राखीसमोर आम्ही सगळेच खूप लहान होतो. पण खरचं ती खूप कमाल आहे. 'बिग बॉस'चा खेळ काही जण खेळत होती. तर काही खेळवत होती. तर खेळवणाऱ्यांमध्ये राखीचा समावेश होतो. बिग बॉसच्या घरात राखी अनेकदा म्हणाली आहे,मी बिग बॉसची बायको आहे. त्याप्रमाणे खरचं ती बिग बॉसची बायको आहे. तिला बिग बॉसचा खेळ खूप चांगल्याप्रकारे खेळता येतो. बिग बॉसचा खेळ कळल्यामुळेच तिने 9 लाख पटकावले आहेत. मी जिंकल्यानंतर राखीला खूप आनंद झाला होता. सगळ्यात जास्त ती आनंदी होती".
'बिग बॉस मराठी' सोशल मीडियावर ट्रोल (Bigg Boss Marathi Troll)
'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वात अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि राखी सावंत हे पाच स्पर्धक अंतिम टप्प्यात होते. किरण माने किंवा अपूर्वा नेमळेकर 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाची महाविजेती किंवा महाविजेता होऊ शकतात असा नेटकऱ्यांचा अंदाज होता. सोशल मीडियावर त्यांचे सर्वाधिक चाहते आहेत. चाहत्यांनी त्यांना वोट्सदेखील दिले होते. निकालाच्या शेवटच्या टप्प्यातदेखील किरण किंवा अपूर्वाचं जिंकणार अशी सोशल मीडियावर चर्चा होती. पण या सर्व फक्त चर्चाचं राहिल्या. अखेर मास्टर माइंड अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. अक्षयचे चाहत्यांकडून कौतुक होत असले तरी नेटकऱ्यांकडून 'बिग बॉस' मराठीला ट्रोल केलं जात आहे.
संबंधित बातम्या