एक्स्प्लोर
‘गदर’सह बॉलिवूड गाजवणाऱ्या रेल्वे इंजिनाचा अपघात
सनी देओल आणि अमीषा पटेलच्या ‘गदर एक प्रेम कथा’ सिनेमांमध्ये महत्त्वाचं आकर्षण ठरलेल्या ‘अकबर’ नावाच्या वाफेच्या इंजिनीचा शनिवारी अपघात झाला. हरियाणातील रेवडीमधील रेल्वे ट्रॅकवर 2 किमी धावल्यानंतर हे इंजिन रुळारुन घसरलं.
गुरुग्राम : सनी देओल आणि अमीषा पटेलच्या ‘गदर एक प्रेम कथा’ सिनेमांमध्ये महत्त्वाचं आकर्षण ठरलेल्या ‘अकबर’ नावाच्या वाफेच्या इंजिनीचा शनिवारी अपघात झाला. हरियाणातील रेवडीमधील रेल्वे ट्रॅकवर 2 किमी धावल्यानंतर हे इंजिन रुळारुन घसरलं.
रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीच्या शकूरबस्तीहून रेल्वे हेरिटेज एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सुब्रतोनाथ, सिनीयर डीएमई अमित गुप्ता, आणि एडीएमई महाबीर सिंह कटारिया रेवडी जंक्शनच्या हेरिटेज लोकोशेडमधील वाफेच्या इंजिनाची पाहाणी करण्यासाठी गेले होते.
निरीक्षणापूर्वी लोको पायलट भारतभूषण वाफेवरच्या इंजिन ‘डब्ल्यूपी-1761 अकबर’ची ट्रायल घेत होते. याचवेळी भारतभूषण यांचं इंजिनावरील नियंत्रण सुटलं, आणि लिंक ट्रॅकवर उभारलेलं लोखंडी गेट आणि भिंत तोडून हा इंजिन धावत मुख्य ट्रॅकपर्यंत आलं. यावेळी लोको पायलटने इंजिनमधून उडी मारुन स्वत: चा जीव वाचवला.
जवळपास दोन किमी धावल्यानंतर हे इंजिन रुळावरुन घसरलं. यानंतर हिसारहून कोळसा घेऊन येणाऱ्या मालगाडीचे लोको पायलट शिवकुमार आणि लोकोशेड फोरमॅन गणपत सिंह यांच्या सूचनेवरुन, स्टेशन अधिक्षक प्रताप सिंह खनगवाल आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
यानंतर रात्री उशिरा दिल्लीहून क्रेन आणून इंजिन पुन्हा हेरिटेज शेडमध्ये पोहोचवण्यात आलं. दरम्यान, या अपघातामुळे ‘अकबर’चं मोठं नुकसान झालं. याच्या दुरुस्तीनंतर हे इंजिन पुन्हा चालू शकेल.
अकबर सिनेमाचा बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये वापर झाला आहे. यामध्ये गदर एक प्रेम कथा, पार्टीशन, गँग ऑफ वासेपूर, सुल्तान, करीब करीब सिंगल, गांधी माय फादर, भाग मिल्खा भाग, टीव्ही मालिका एक था चंद्र एक थी सुधा, की अँड का, याशिवाय तामिळ सिनेमा विजय-61 आदी सिनेमांमध्ये अकबरचा वापर झाला होता.
यातील सुल्तान, भाग मिल्खा भाग, करीब-करीब सिंगल, गांधी माय फादर आदी सिनेमांचं शूटिंग रेवडीमध्येच झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement