Akanksha Dubey Suicide Case: आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी गायक समर सिंहला अटक; अभिनेत्रीच्या आईनं केले होते गंभीर आरोप
आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी समर सिंहला (Samar Singh) अटक केली आहे.
Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरीची अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गायक आणि निर्माता समर सिंहला (Samar Singh) अटक केली आहे. समर सिंहला गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली. आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर समर सिंह फरार झाला होता. समर सिंहवर आकांक्षा दुबेच्या आईनं गंभीर आरोप केले होते.
समर सिंहला आज गाझियाबाद न्यायालयात हजर केले जाईल, तेथून ट्रान्झिट रिमांड घेण्यात येईल त्यानंतर पोलीस त्याला वाराणसीला आणतील. समर सिंह याला नंदग्राम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. समर हा चार्म क्रिस्टल सोसायटीमध्ये बऱ्याच दिवसांपासून लपून बसला होता, त्याच्या शोधात पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत होते. आकांक्षा हिच्या आत्महत्येनंतर अकरा दिवसांनी आरोपी समर सिंहला अटक करण्यात आली आहे.
आकांक्षा दुबेच्या आईनं केले होते गंभीर आरोप
25 वर्षीय आकांक्षा दुबे ही आगामी सिनेमाच्या शुटिंगसाठी वाराणसीला गेली होती. शुटिंगदरम्यान ती सारनाथ येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. आकांक्षाने गळफास घेतल्यानंतर तिच्या मेकअप आर्टिस्टने तिला पहिल्यांदा त्या अवस्थेत पाहिलं आणि पोलिसांना माहिती दिली. आकांशाच्या आईने समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आकांशाला ब्लॅकमेल करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आकांशाच्या आईनं समर आणि संजयवर केला आहे. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.
आकांक्षाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी आकांक्षा आणि समर एका पार्टीला गेले होते, असं म्हटलं जात आहे. 25 मार्चच्या रात्री आकांक्षा तिच्या बर्थडे पार्टीसाठी गेली होती. तेव्हा ती आनंदी होती. या पार्टीला ब्रेकअप पार्टी असे नाव देण्यात आले, असंही म्हटलं जात आहे.
आकांक्षा आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आकांक्षा-समर यांची भेट 3 वर्षांपूर्वी झाली होती, असंही म्हटलं जात आहे. टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवरदेखील तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. आकांक्षाने वयाच्या 17 व्या वर्षी तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करने वाले की 2' सारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Akanksha Dubey : भोजपुरी गायकाविरोधात गुन्हा दाखल; आकांक्षाला धमकी आणि टॉर्चर केल्याचा आरोप