एक्स्प्लोर
ऐश्वर्या म्हणते, सलमान खानसोबत काम करण्यास तयार, पण...
मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानसोबत काम करण्यास तयार झाली आहे. मात्र, सलमानसोबत काम करण्यासाठी ऐश्वर्याने एक अट ठेवली आहे आणि ती अट पूर्ण न झाल्यास सलमानसोबत काम करणार नसल्याचेही तिने म्हटलं आहे.
एका मॅगझिनला दिलेल्या मुलखतीत ऐश्वर्याने सांगतिलं, "सलमान खानसोबत पुन्हा काम करण्यास काहीच हरकत नाही. चांगली स्क्रीप्ट मिळाल्यास सलमानसोबत काम करण्याचा नक्की विचार करेन."
"सिनेमाची स्क्रिप्ट आणि दिग्दर्शक दोन्हीही उत्तम असतील, तर सलमानसोबत काम करण्यास तयार आहे." अशी अट ऐश्वर्याने बोलून दाखवली आहे.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांच्या चाहत्यांसह अवघ्या हिंदी सिनेसृष्टीसाठी ऐश्वर्याचं हे विधान मोठं आहे. कारण याआधी ऐश्वर्या म्हणाली होती की, सलमानसोबत कधीही काम करणार नाही.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी 'हम दिल दे चुके है सनम' या सुपरहिट सिनेमामध्ये एकत्र काम केलं होतं. या दोघांचं अफेअरही होतं. त्यानंतर ब्रेकअप झालं आणि ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. त्यानंतर या जोडीने कोणताही एकत्र सिनेमा केला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement