Akshay Kumar Movie : सम्राट पृथ्वीराजनंतर खिलाडी कुमार करणार करण जोहरचा सिनेमा; सी शंकरन नायर यांचा बायोपिक
Akshay Kumar In Karan Johar Film : अक्षय कुमारचा बिग बजेट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अनन्या पांडेदेखील दिसणार आहे.
Akshay Kumar Ananya Panday In C Sankaran Nair Biopic : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. 'सम्राट पृथ्वीराज'नंतर अक्षय कुमार आता करण जोहरच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत अनन्या पांडेदेखील दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
करण जोहर प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यसेनानी सी शंकरन नायर (C Sankaran Nair) यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात अनन्या वकिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सी शंकरन नायरच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत
अक्षय कुमारचा आगामी सिनेमा सी शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात सी शंकरन नायर यांच्या जीवनातले अनेक पैलू उलगडले जाणार आहेत. करण सिंह या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सी शंकरन नायर हे स्वातंत्र्यसेनानी होते. जालियनबाला बाग हत्याकांडमध्ये सी शंकरन यांचा महत्त्वाचा वाटा होता. हा सिनेमा पुष्पा पलट यांच्या 'द केस दॅट शुक द एम्पाअर' या कादंबरीवर आधारित आहे.
अक्षय कुमारचे आगामी सिनेमे
रिपोर्टनुसार, अक्षय कुमार लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'राम सेतु', 'रक्षाबंधन', 'ओह माय गॉड 2', 'बडे मिया छोटे मियां', 'मिशन सिंड्रेला', 'सेल्फी', 'गोरखा' आणि 'कॅप्सूल गिल' हे अक्षय कुमारचे आगामी सिनेमे आहेत.
अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराजने केली 39.40 कोटींची कमाई
सम्राट पृथ्वीराजनं आत्तापर्यंत 39.40 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं 10.70 कोटींची कमाई केली होती. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो.
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
संबंधित बातम्या