Adipurush: 'आदिपुरुष'मधील हनुमानाचा डायलॉग ऐकून भडकले नेटकरी; प्रभासच्या लूकवरही केली टीका
काही नेटकरी सोशल मीडियावर आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचं कौतुक करत आहेत, तर काही जण या चित्रपटाला ट्रोल करत आहेत.
![Adipurush: 'आदिपुरुष'मधील हनुमानाचा डायलॉग ऐकून भडकले नेटकरी; प्रभासच्या लूकवरही केली टीका Adipurush brutally trolled on social media netizens angry making fun prabhas ram look and devdatta nage hanuman Dialogue Adipurush: 'आदिपुरुष'मधील हनुमानाचा डायलॉग ऐकून भडकले नेटकरी; प्रभासच्या लूकवरही केली टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/16/097b48ff4f7f9ef8e2e635a06ebde7af1686919976203259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Adipurush: गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या टीमनं या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. आता आज (16 जून) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अनेक लोक या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही नेटकरी सोशल मीडियावर या चित्रपटाचं कौतुक करत आहेत, तर काही जण या चित्रपटाला ट्रोल करत आहेत.
हनुमानाचा डायलॉग ऐकून भडकले नेटकरी
आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागेनं (Devdatta Nage) हनुमानाची भूमिका साकारली आहे. सध्या आदिपुरुष या चित्रपटातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आदिपुरुष चित्रपटातील हनुमानाचा एक डायलॉग ऐकू येत आहे. या डायलॉगला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर ट्वीट शेअर केलं, 'हा चित्रपट सेन्सॉर बोर्डानं कसा काय पास केला, या चित्रपटात काम करणाऱ्या लोकांनी रामायणाचा विनोद कसा होऊ दिला? इथे काय चालले आहे.'
How did this movie get pass the censorship board, how did people working on this movie let Ramayana be made a joke of? What is going on here. I can’t believe these dialogues. #Adipursh https://t.co/pR6nlDIzwK
— ❀ ❥ Ankita ❥ ❀ (@_whatsinaname7) June 16, 2023
प्रभासच्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
आदिपुरुष या चित्रपटात प्रभासनं प्रभू श्री रामाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील प्रभासच्या लूकला अनेकांनी ट्रोल केलं आहे.
By the way look at that hair of his🤣🤣🤣#AdipurushWithFamily #AdipurushWithFamily #Adipursh #AdipurshReview https://t.co/Kc3Vqjy5tb
— T͎o͎m͎(F͎a͎n͎) (@kingkhanNbr1) June 16, 2023
What can be bigger disgrace of entire mankind than watching Rakshas Prabaas portraying
— मैथ्यू वेड (@matthen49) June 16, 2023
सूर्यवंशी रघुकुलनंदन कमल के समान नेत्रों वाले अति सुंदर प्रभु श्री रामचंद्र
#Adipursh #Adipurush #AdipurushReview pic.twitter.com/GOp1yd2Wqq
अभिनेत्री कृती सेनननं आदिपुरुष या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)