एक्स्प्लोर

Car Accident : बॉलिवूड अभिनेत्याचा भीषण कार अपघात, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

Praveen Dabas Car Accident : अभिनेता प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाला असून त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Actor Praveen Dabas Car Accident : बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी मुंबईत प्रवीण डबासचा कार अपघात झाला. अपघातानंतर जखम प्रवीणला मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे.

अभिनेता प्रवीण डबासचा भीषण कार अपघात ( Pravin Dabas Car Accident )

एबीपीला मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता प्रवीण डबासचा भीषण अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. प्रवीणची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं समोर आलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, प्रवीणची पत्नी प्रीति झांगियानी सध्या त्याच्यासोबत रुग्णालयात आहे. वांद्रे येथील हेली क्रॉस रुग्णालयात प्रवीण डबासला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अभिनेत्याच्या पत्नीने दिली माहिती

प्रवीण डबास यांची पत्नी प्रीती झिंगियानी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "या अपघातानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे. मेडिकल अपडेटनुसार, प्रवीणला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सीरियस कंसशन म्हणजेच मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानंतरच्या स्थितीत आहे. त्याला आणखी दुखापत झाली आहे का, हे पाहण्यासाठी डॉक्टरांकडून सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यात येत आहेत.तो या क्षणी जास्त हालचाल करू शकत नाही. अपघातापूर्वी तो त्याच्या कामाच्या ओझ्यामुळे फार व्यस्त होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Parvin Dabas (@dabasparvin)

अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका

बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबास सध्या 50 वर्षांचा आहे. अभिनेता प्रवीण डबास अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. प्रवीणने आतापर्यंत दिल्लगी, मान्सून वेडिंग, खोसला का घोंसला, द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय, मैने गांधी को नही मारा, ये है जिंदगी, कुछ मीठा हो जाए, इंदू सरकार, रागिनी एमएमएस 2, हे अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

10 महिन्यात अभिनेत्रीने 9 कोटी फी वाढवली, तरीही चित्रपटांच्या भरभरुन ऑफर; पहिल्याच चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Liquor in Car : तुम्ही कारमध्ये किती दारू नेऊ शकता? कायदा काय सांगतो?
तुम्ही कारमध्ये किती दारू नेऊ शकता? कायदा काय सांगतो?
Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSupriya Sule Speech : कुणाच्या कामात ढवळाढवळ नको म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये येत नव्हते, सुळेंचा टोला?Rashmi Thackeray Banner : रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बॅनेरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेखAmol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Liquor in Car : तुम्ही कारमध्ये किती दारू नेऊ शकता? कायदा काय सांगतो?
तुम्ही कारमध्ये किती दारू नेऊ शकता? कायदा काय सांगतो?
Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Embed widget