एक्स्प्लोर

10 महिन्यात अभिनेत्रीने 9 कोटी फी वाढवली, तरीही चित्रपटांच्या भरभरुन ऑफर; चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे चर्चेत

Tripti Dimri Increased Fees : अभिनेत्री तृप्ती डिमरीने फक्त दहा महिन्यात 9 कोटी रुपये फी वाढवली आहे.

Animal Actress Increased Fees : बॉलिवूडमध्ये काही कलाकार रातोरात स्टार बनतात, तर काहींना स्टारडम मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाट पाहावी लागते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कधी-कधी स्टारडम मिळवण्यास वेळ लागत नाही, पण ते स्टारडम टिकवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे रातोरात स्टार झाले, पण त्यांना प्रसिद्धी टिकवता आली नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला टिकवून ठेवणं हा मोठा टास्क आहे. ॲनिमल चित्रपटातून एका अभिनेत्रीला चांगलाच स्टारडम मिळाला, यानंतर तिने फक्त दहा महिन्यात 9 कोटी रुपये फी वाढवली आहे. 

फक्त दहा महिन्यात कोट्यवधींनी फी वाढवली

अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चांगलीच प्रकाशझोतात आहे. ॲनिमल चित्रपटातील तिच्या रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तृप्ती डिमरी अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. 2024 वर्ष तृप्ती डिमरीसाठी खास ठरल्याचं दिसत आहे. तृप्ती डिमरी आणि विकी कौशल्याच्या गूड न्यूज चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता दिवाळीमध्ये तृप्ती कार्तिक आर्यनसोबत भूल भुलैय्या 3 चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती आगामी धडक 2 चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीसोबत झळकणार असून आशिकी 3 मध्येही ती कार्तिक आर्यनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पहिल्या चित्रपटात इंटिमेट सीनमुळे चर्चेत

तृप्ती डिमरीने एका चित्रपटात सुमारे अर्धा तासाची भूमिका केली आणि ती रातोरात लोकप्रिय झाली. तृप्ती सुरुवातील एका चित्रपटासाठी 40 लाख रुपये मानधन घेत होती आणि आता ती एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये फी घेते. तृप्ती डिमरीने रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटात सुमारे 30 मिनिटांची भूमिका साकारली होती आणि त्यासाठी तिने 40 लाख रुपये फी आकारली होती. नंतर ती बॅड न्यूज या चित्रपटातही विकी कौशलसोबत दिसली. बॅड न्यूज चित्रपटासाठी तृप्तीने 80 लाख रुपये फी घेतली होती. मीडिया रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरीने त्यानंतर फी वाढवून 6 कोटी रुपये केली होती. त्यानंतर आता पुन्हा तिने फी वाढवली होती.

View this post on Instagram
 
A post shared by GRAZIA India (@graziaindia)

तृप्तीने लाखांपासून कोट्यवधींपर्यंतची मजल मारली आहे. फक्त दहा महिन्यांमध्ये तृप्ती डिमरीने तिची फी 9 कोटींनी वाढवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तृप्तीने सध्या तिची मागणी आणि चित्रपटांचं बॉक्स ऑफिसवरील यश पाहता तिची फी 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Liquor in Car : तुम्ही कारमध्ये किती दारू नेऊ शकता? कायदा काय सांगतो?
तुम्ही कारमध्ये किती दारू नेऊ शकता? कायदा काय सांगतो?
Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSupriya Sule Speech : कुणाच्या कामात ढवळाढवळ नको म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये येत नव्हते, सुळेंचा टोला?Rashmi Thackeray Banner : रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बॅनेरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेखAmol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Liquor in Car : तुम्ही कारमध्ये किती दारू नेऊ शकता? कायदा काय सांगतो?
तुम्ही कारमध्ये किती दारू नेऊ शकता? कायदा काय सांगतो?
Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Embed widget