एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तेची साहेब ओळखावे, 'ठाकरे'मधील नवाजुद्दीनचा लूक
या चित्रपटात शिवसेनेची मुहूर्तमेढ दाखवली जाणार आहे. यात नवाजुद्दीन यांच्यासोबत प्रवीण तरडे, संजय नार्वेकर, संदीप खरे यांच्याही भूमिका आहेत.
मुंबई : दिग्दर्शक अभिजीत पानसेने आपल्या पहिल्याच सिनेमातून समीक्षकांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्याने बनवलेला 'रेगे' कौतुकास्पद होता. आता त्याने आपल्या अंगावर शिवधनुष्य घेतलं आहे. कारण संजय राऊत यांची निर्मिती असलेला 'ठाकरे' या चित्रपटाचं दिग्दर्शन तो करतो आहे.
'ठाकरे' सिनेमात राज-उद्धव नव्हे; साळवी, जोशींना महत्त्वाचं स्थान!
या सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव जाहीर झालं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण चित्रपटाचा टीजर आला आणि आपण खरंच बाळासाहेब ठाकरे यांना पाहतो की काय असं वाटून गेलं.
सध्या या चित्रपटाचं चित्रिकरण चालू आहे. याचवेळी नवाजुद्दीन सिद्दीकी वठवत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची छबी समोर आली आणि क्षणभर उभ्या महाराष्ट्राचा श्वास रोखला गेला.
या सिनेमामध्ये रंगभूषेला खूप महत्व दिल्याची चर्चा आहे. नवाजुद्दीनचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याची कल्पना येते. या फोटोत साहेबांचा अॅटिट्यूड, त्यांची पाहण्याची पद्धत, सोबत खांद्यावर टाकलेली भगवी शाल आणि समोर ठेवलेला गरुड... यातून कट्टर साहेब समर्थकांना सगळं काही समजतं. या फोटोमुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढलीय हे निश्चित. या चित्रपटात शिवसेनेची मुहूर्तमेढ दाखवली जाणार आहे. यात नवाजुद्दीन यांच्यासोबत प्रवीण तरडे, संजय नार्वेकर, संदीप खरे यांच्याही भूमिका आहेत. संबंधित बातम्या बाळासाहेबांवरील 'ठाकरे' सिनेमातील भूमिका खूपच टफ : नवाजुद्दीन ... म्हणून बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनची निवड : संजय राऊत पाहा ट्रेलरआजही त्यांचा आवाज एेकला की उभा महाराष्ट्र थरारतो. अवघा महाराष्ट्र ज्यांच्या एका आदेशावर उठून उभा रहायचा असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. अभिजीत पानसे दिग्दर्शित या सिनेमात @Nawazuddin_S बाळासाहेब्र ठाकरे यांच्या भूमिकेत असे दिसतायत. #मराठी pic.twitter.com/zpK1Vefwkm
— Soumitra Pote (@soumitrapote) June 11, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement