एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आता वेब सीरीजही, मुख्य भूमिकेत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर लवकरच वेब सीरीज येणार आहे. अभिनेता महेश ठाकूर यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे
![पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आता वेब सीरीजही, मुख्य भूमिकेत... Actor Mahesh Thakur to play PM Narendra Modi in web series पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आता वेब सीरीजही, मुख्य भूमिकेत...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/13125823/PM-Narendra-Modi-Web-Series-Mahesh-Thakur.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटानंतर आता वेब सीरीजही येणार आहे. 'इरॉस नाऊ' दहा भागांची सीरीज सुरु करणार असून प्रसिद्ध अभिनेता महेश ठाकूर यामध्ये मोदींची भूमिका साकारणार आहे.
नुकताच महेश ठाकूर यांचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून 2014 मध्ये पंतप्रधानपदाची माळ गळ्यात पडेपर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास या वेब सीरीजमधून उलगडणार आहे.
अभिनेता महेश ठाकूरने तू तू मै मै, शरारत, ससुराल गेंदा फूल, बिदाई, इश्कबाज यासारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्याशिवाय हम साथ साथ है, आशिकी 2, जय हो यासारख्या सिनेमातही तो झळकला होता.
गुजरातमध्ये या वेब सीरीजचं शूटिंग पार पडलं आहे. सर्वांसमोर न आलेल्या पंतप्रधानांच्या स्वभावाचे अज्ञात कंगोरे या वेब सीरीजमधून मांडण्याचा प्रयत्न असेल, असं महेश ठाकूरने सांगितलं. मोदींसोबत इतर व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची उत्सुकता कायम आहे.
दुसरीकडे, पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका करणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सिनेमा आणि वेब सीरीज अशा दोन माध्यमातून मोदींचं व्यक्तिमत्त्व समोर येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)